Saturday, April 4, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

ते दोन्ही जागेचे पालकमंत्री झालेलं आवडेल -अमृता फडणवीस

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबरोबरच त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढवावी. अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून केली आहे. यावर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.फडणवीस यांची जन्मभूमी, कर्मभूमी, बालेकिल्ला नागपूर आहे, पण असं असलं तरी आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते काम करतात. पुणं माझं आजोळ आहे. मला जेव्हा चान्स मिळतो तेव्हा मी येथे येते असते.  त्यामुळे ते दोन्ही जागेचे पालकमंत्री झालेलं आवडेल. असे त्यांनी म्हटले आहे. 

भाजपचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला अमृता फडणवीस यांनी हजेरी तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना मत व्यक्त केले. तसेच अमृता फडणवीस यांनी गाणं गाऊन उपस्थितांची मनं जिंकली. . 

अमृता फडणवीस म्हणाल्या की, दहीहंडी हा खेळ कृष्ण भगवान यांच्यापासून सुरू झाला आहे. त्याला पाठिंबा मिळणार आहे. खूप चांगली गोष्ट आहे की या खेळाला आरक्षण दिलं आहे. ही आपली परंपरा आहे, त्यांना वाव मिळायलाच हवा. हे आपल्या संस्कृतीसाठी खूप चांगली गोष्ट आहे, असे मत त्यांनी दहीहंडी या खेळ प्रकारातील गोविंदांना दिलेल्या आरक्षणावर व्यक्त केले.
नव्या सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यावर बोलतांना अमृता फडणवीस म्हणाल्या , सगळ्यांना माहिती आहे की सरकार कस आलं आहे. जे बोलतात त्यांचा बेस काय आहे. जे बोलतात त्यांची विश्वासहार्यता काय आहे. त्यामुळे त्यांच्यावर कमेंटही करणं ही बिलो डिग्निटी होईल.असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading