गोविंदांच्या काळजीसाठी पुणे पोलिसांचा पुढाकार
पुणे : दरवर्षी दहीहंडीच्या निमित्ताने होणाऱ्या उत्सवामध्ये अनेकदा अतिउत्साहाच्या भरात, पुरेशी काळजी न घेतल्याने अनेक गोविंदा जखमी होतात .या गोविंदांना जर वेळेवर उपचार मिळाले नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. यामुळे अनेकदा गंभीर दुर्घटना घडतात .याचा विचार करून यंदा “पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास”च्या वतीने दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या परिसरात सुसज्ज रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. याच्यामध्ये तज्ञ डॉक्टर, स्वयंसेवक, आपत्कालीन उपचारांसाठी लागणाऱ्या वस्तू,औषध यांचा समावेश असणार आहे.
रुग्णवाहिका बेलबाग चौक, अलका टॉकीज चौक येथे तसेच एक रुग्णवाहिका फिरती असणार आहे. या रुग्णवाहिकांचे आपत्कालीन फोन नंबर्स सोबत देत आहोत. डॉ. मिलिंद भोई (9822097555), डॉ. नंदकिशोर बोरसे (9422032696), सदाशिव कुंदेन (9921574499), डॉ.बोरा (9822969661), डॉ. कुणाल कामठे (9890616365), डॉ. विजय पोटफोडे (9890825200). वैद्यकीय मदतीची गरज असणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व स्वयंसेवकांनी व गोविंदा पथकांनी आवश्यकता पडल्यास या नंबर वर संपर्क करावा, असे आवाहन विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉ.मिलिंद भोई यांनी या निमित्ताने केले आहे.
फोटो – प्रातिनिधीक
