Thursday, May 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सागर बंगल्यावर वॉशिंग मशीनचं काम चालतं – बाळासाहेब थोरात


मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. याच प्रकरणावर सागर बंगला कदाचित वॉशिंग मशिनसारखं काम करत असेल असे व्यक्तव्यराज्याचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी थोरात यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

पुण्याच्या पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी फडणवीस सरकारच्या काळात अनेक नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी शुक्ला यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यातच रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

यावर बोलताना थोरात म्हणाले,सागर बंगला कदाचित वॉशिंग मशिनसारखं काम करत असेल,देशात सध्या जे काही चालू आहे ते योग्य नाही आणि देशाच्या हिताचे नाही. राज्यात ईडीचे सरकार असून लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. अशा शब्दात थोरातांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी आज आम्ही करणार आहोत. सध्या राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं, असं आवाहन देखील थोरात यांनी यावेळी केलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading