Saturday, September 5, 2026
ENTERTAINMENTLatest News

ही भूमिका माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे : शिवानी नाईक

झी मराठी वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ हि नवीन मालिका २२ ऑगस्ट ,संध्याकाळी ७:०० पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ह्या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक स्मॉल स्क्रीनवर पदार्पण करत आहे. शिवानी ने आजवर अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकातून आपली अभिनयाची छाप पाडली आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी अप्पी ला पाहिलं आणि या भूमिकेतूनदेखील शिवानी प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळवणार आहे.

या मालिकेबद्दल व आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली कि, ” ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. मी ह्या मालिकेत अपर्णा सुरेश माने ची भूमिका साकारत आहे . तिचे बाबा रिक्षा चालवतात.तिचा छान घर आहे आणि  त्या घरात आई , बाबा आणि भाऊ राहतात. तीच एक स्वप्न आहे कलेक्टर व्हायचं आहे आणि ते ती कस साध्य करते हा तिचा प्रवास दाखवणार आहे. हे मालिकेतून प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईल. अप्पी सामाजिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करून काही तरी करू पाहते आणि हि भूमिका माझासाठी खूप प्रेरणादायी आहे. ह्या भूमिकेसाठी मी खूप मेहेनत घेते आहे आणि मालिका प्रेक्षकांना आवडेल अशी अपॆक्षा ठेवते.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading