Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मंत्र्यांचे खाते वाटप लवकर होणे आवश्यक -विरोधी पक्ष नेते अजित पवार

पुणे : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला तरी. खाते वाटप अजून झाले नाही. त्यावर विरोधी पक्ष सतत सारखे टीका करत आहेत. हा दोघांचा आवडता शब्द झाला आहे. आता खूपच लवकर करा कारण अधिवेशनात उत्तर द्याव लागेल.  दोन महिने पूर्ण झाले तरी या सरकारने अजून प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री नेमला नाही.  त्यामुळे जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण हे पालकमंत्र्यांविनाच होणार आहे.अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर केली.

एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या सध्याचे राजकारण चालू त्यावर अजित पवार म्हणाले,शिवसेनेमध्ये जे काही झालं ते सामान्य नागरिकांना आणि शिवसैनिकांना आवडलेलं नाही. ज्यांना निवडून आणलं ते टर्म संपेपर्यंत राहतात. पण सेनेचा इतिहास आहे.जे बंडखोरी करून बाहेर पडत असतात. ते परत निवडून येत नाहीत. छगन भुजबळ आणि नारायण राणे ही उदाहरण आहे, अशी आठवणच अजित पवार यांनी बंडखोरांना करून दिली.

काँग्रेसचे प्रयत्न देखील नाना पटले यांनी काही दिवसापूर्वी आघाडी झाली ती अनैसर्गिक असे विधान केले आहे. त्यावरअजित पवार म्हणाले,महाविकास आघाडीचं काम सुरू आहे. अधिवेशनात एकत्रित काम करणार आहोत. नाना पटोलेंनी काय बोलायच हे त्यांनी ठरवावं. त्यांच्याबद्दल काय भूमिका आहे. काँग्रेस पक्ष मांडेल. पण वेगवेगळ्या विचारधारेचे असून ही आम्ही एकत्र आहोत. मजबुतीने सरकार चालवलं आता विरोधातही एकत्र राहू. असंही अजित पवार म्हणाले.
सहकारी बँकिंग क्षेत्रात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदावरील नियुक्ती महा विकास आघाडी सरकारच्या काळात आघाडी सरकारने केली होती. नव्या सरकारने रद्द केली आहे. त्यावर अजित पवार म्हणाले,विद्याधर अनास्कर याना पक्षाचा शिकका नाहीय.आमच्या काळात त्यांची नियुक्ती होती.मात्र आता का काढलं माहिती नाहीय. सभागृहात विषय निघालयावर आम्ही मांडू. असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading