Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

हर घर तिरंगा – आरटीओ आणि ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या वतीने कार रॅली

पुणे : केंद्र शासनाच्या ” हर घर तिरंगा” या विषयाला अनुसरून रस्ता सुरक्षा निमित्त जनजागृती मोहीम राबविण्या करिता महेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल, प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, पुणे ट्रॅफिक पोलिस , पुणे शहर पोलिस व महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल च्या प्रशिक्षण वाहनाची कार रॅली आर टी ओ,पुणे येथुन जांभूळवाडी रोड पर्यंत आयोजित केली गेली

संजीव भोर ( उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ) ,  अश्विनी सातपुते (पोलीस निरीक्षक, बंनगार्डन गुन्हे अन्वेषण विभाग) , यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला  राजेंद्र पाटील ( सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी) ,  युवराज पाटील ( सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी) ,   लखन कुमार झुणके( सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक), मा. सुभाष मंडलिक ( प्रादेशिक परिवहन वाहन चालक ) एकनाथ ढोले , विठ्ठल मेहता , कृष्णा दाभाडे , विनायक कुलकर्णी ,सचिन गामाजी आदि उपस्थित होते. 

पुण्यामध्ये प्रथमच अशा प्रकारची रॅली , वाहतुकीचे सर्व नियम पाळून महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे मालक शशांक शिळीमकर व संचालक  महेश शिळीमकर (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली व या रॅली मध्ये महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे सर्व वाहन प्रशिक्षक देखील उपस्थित होते. या रॅली ची सांगता महेश ड्रायव्हिंग स्कूल जांभूळवाडी ऑफिस येथे करण्यात आली .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading