केंद्रातील भाजपच्या हद्दपारीस बिहारमधून सुरवात.. काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : ब्रिटीश-विरोधी’ स्वातंत्र्याचा सत्त्याग्रह बिहार (पश्चिम – चंपारण) मधून सर्वप्रथम झाला, बिहार मध्ये अन्याय कारक भाजप’ला नाकारून, ‘जद-राजद-काँग्रेस’ युती ची सुरवात ही इतिहासाची पुनरावृत्ती.. व केंद्रातील भाजपच्या हद्दपारीची सुरवात झाल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी ‘बिहार सत्तबदल प्रतिक्रिया’ प्रसंगी केले..!
भाजप च्या शीर्ष नेतृत्वाची, प्रादेशिक पक्षांविषयी आकसाची व संपुष्टात आणण्याची भूमिका, सीएए / एनआरसी, कृषी विधेयक व अग्नीपथ सैन्य भरती बाबत केंद्राची मनमानी भुमिका, राफेल व पिगॅासस बाबत संशयग्रस्त भुमिका, वाढती महागाई व बेरोजगारी रोखण्यात केंद्राचे अपयश या व इतर लोकशाही व संविधानात्मक मुल्यांची जपणुकी करीतांच् मा नितीशकुमार यांचे नेतृत्वाखालील जदयु ने ‘मनमानी ग्रस्त भाजप’ची साथ सोडली व याची सुरवात बिहार येथून झाली.. येत्या काळात ‘देशांतर्गत सत्ता बदलाची ही सुचिन्हे’ आहेत व काँग्रेस पक्ष बिहार मधील सत्ता बदलाचे स्वागत करत असल्याचे, ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.. ‘भारतीय स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करतांना, “स्वातंत्र्याच्या जन-नायकांचे फोटो छापून” कृतज्ञता’पर गौरव करण्या ऐवजी, देशातील सत्ताधारी भाजपनेते ‘करोडोंच्या नागरी पैशातून’ स्वतःचेच् फोटो झळकावून घेण्याची हौस पुरी करत आहेत… हा प्रकारच मुळी संकुचित व आत्मकेंद्रीत आहे…! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त भाजप करोडोंच्या कररूपी सरकारी पैशातून करत असलेली जाहीरात बाजीची ऊधळपट्टी निषेधार्य आहे.. याच करीता जीवनावश्यक वस्तूंवर देखील जीएसटी आकारणी केली काय(?) अशी ऊपरोधीक टीका देखील गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी केली..!
