Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

Pune – राष्ट्रवादीला धक्का माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे  :आज राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रभाग क्रमांक १च्या माजी नगरसेविका सौ रेखा चंद्रकांत टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे ,शहराध्यक्ष जगदिश मुळीक,खासदार गिरीश बापट ,यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बोलताना सौ टिंगरे म्हणाल्या की’ भारतीय जनता पार्टी ही लोकाभिमुख कामातून विकास करते त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. पुढच्या काळात भारतीय जनता पार्टीची विचारधारा घेऊन काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading