Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

सामाजिक संघटना एकत्रित येत क्रांती दिनी राष्ट्रक्रांती आघाडी पक्षाची स्थापना

पुणे : राज्यातील महत्वाच्या संघटना आज एकत्र येत त्यांनी राज्य सरकारला पर्याय निर्माण केला आहे.राज्यात पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मधे सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेत आज पक्ष स्थापन करण्यात आला. राष्ट्रक्रांती आघाडी नावाने पक्षाची स्थापना करण्यात आली.

पुण्यात या पक्षाची घोषणा करत पक्षांनी पहिला मेळावा आज घेण्यात आला.राज्यातील अनेक सामाजिक संघटनांनी एकत्रित येतं क्रांतिदिनचं औचित्य साधत राष्ट्रक्रांती आघाडी पक्षाची स्थापना करण्यात आली .या पक्षाचं नेतृत्व बाळासाहेब सानप,अतुल खुपसे,बालाजी शिंदे करणार आहेत. ओबीसी व्हेजेएनटी जनमोर्चा, जनशक्ती शेतकरी संघटना, झुंजार शेतकरी संघटना, सरपंच परिषद,शेड्युल कास्ट फेडरेशन, नाभिक समाज संघटना,राष्ट्रीय ओबीसी परिषद,जय भगवान महासंघ,शिवराज्य शेतकरी संघटना,बेलदार समाज संघटना, यशवंत सेना संघटना,अखिल भारतीय धोबी समाज महासंघ, श्रमकरी कामगार संघटना राष्ट्रक्रांती आघाडी पक्षस्थापने मध्ये सहभागी झालेल्या आहेत.बाळासाहेब सानप. राष्ट्रक्रांती आघाडीचे अध्यक्ष. बालाजी शिंदे महासचिव. अतुल खुपसे . कार्याध्यक्ष राजू साळुंके – खजिनदार व प्रदेश अध्यक्ष. श्रुती म्हात्रे महिला प्रदेश अध्यक्ष. विनिता बर्फे स्टार प्रचार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading