fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

राष्ट्रध्वजाचे महत्त्व कळल्याने मोदींच्या मनातील अर्धा अंधार दूर झाला आहे, संविधानाची कास धरून उरलेला अर्धा दूर करावा.–डॉ.बाबा आढाव

पुणे :– नरेंद्र मोदि ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. त्या संघाने भारतीय राष्ट्रध्वजाचा स्वीकार कधीही केला नाही.उलट 1947 ला आपल्या मुखपत्रातून राष्ट्रध्वजाची संघाने निंदा केली. त्याच संघाच्या मोदींना उपरती झालेली दिसते.पंतप्रधान म्हणून आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात राष्ट्रध्वजाचे महत्त्व त्यांना पटले आहे असे वाटते.म्हणून त्यांनी हर घर तिरंगा घोषणा दिली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. परंतु फक्त हर घर तिरंगा ही घोषणा हर घर सविधान शिवाय अपुरी आहे. म्हणून राष्ट्रध्वजाचे महत्त्व पटल्याने मनातील अर्धा अंधार दूर झालेल्या मोदी यांनी संविधानाची कास धरून राज्यकारभार करावा आणि मनातील राहिलेला अर्धा अंधार दूर करावा, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ.बाबा आढाव यांनी आज दिला.

बुधवार पेठ येथील हुतात्मा स्मारकापासून आज महागाई व तसंच असंघटित कामगारांचा प्रश्नी राष्ट्रीय एकात्मता एकात्मता समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.त्याच्या सुरुवातीला हुतात्मा भास्कर कर्णिक यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यावर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले सध्या भारताचे संविधान बाजूला ठेवून मोदी-शहा विधानाने देश चालवला जात आहे आणीबाणीच्या काळात त्यावेळच्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाने जसा मिसा कायद्याचा दुरुपयोग केला आणि आपल्या विरोधकांना या कायद्याद्वारे जेलमध्ये टाकले. आज या इतिहासाची जास्त भयानक पुनरावृत्ती होत असून मिसा ऐवजी ईडी चा वापर विरोधकांना संपवण्यासाठीचे कारस्थान मोदी शहा करत आहेत. केंद्र सरकारच्या या लोकशाही, स्वातंत्र्य आणि संविधान विरोधी कारभाराचा जनतेने मूलभूत विषय घेऊन जाब विचारला पाहिजे.समितीचे निमंत्रक नितीन पवार म्हणाले, पंतप्रधान अपने ही मन की बात लोकांना ऐकवतात. जनतेचे अवघड झालेले जगणे त्यासंबंधीचे प्रश्न ऐकायला त्यांना वेळ नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या तोंडावर जन की बात , केंद्र सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी 9ऑगस्ट ते 15 ऑगस्ट क्रांती सप्ताह,जन की बात ,घर घर संविधान अभियान समितीने आयोजित केले आहे.
या सप्ताहात केंद्र शासनाच्या धोरणामुळे सामान्य माणसाचे जगणे हराम झालेल्या एका मुद्द्यावर दररोज संघर्षात्मक कृती केली जाणार आहे. सप्ताहाचा शेवट जनतेने हातात हात घालून या देशातील स्वातंत्र्य लोकशाही आणि संविधानाची मूल्य टिकवण्याचा निर्धार करून होणार आहे. 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वजा बरोबरच जनतेने आपल्या घरावर संविधानाच्या मूल्यांचा फलकही लावावा असे आवाहन करणारे हर घर संविधान हे अभियानही समितीच्या वतीने राबविले जात आहे.

उद्या क्रांती सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी 10 ऑगस्ट रोजी अंगणवाडी ताई, आशा कर्मचारी इत्यादी योजना कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी दुपारी 12.30वा. जिल्हाधिकारी कचेरी ते विभागीय आयुक्त पुणे असा मोर्चा काढून निदर्शने करणार आहेत. अशी माहिती राष्ट्रीय निमंत्रक समितीचेनितीन पवार यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading