Thursday, May 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

…तिसरा रेकॉर्ड कराल तेव्हा मात्र मला बोलवू नका असे का? म्हणाले देवेंद्र फडणवीस

पुणे : शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर 38 दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये शिंदे आणि भाजपकडून प्रत्येकी 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे विद्यापीठ येथे आयोजित केलेल्या ‘स्वराज्य महोत्सव आणि घरोघरी तिरंगा’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. पण, भाषणाच्या शेवटी त्यांनी यावर सारवा सारव केली.

हर घर तिरंगाच्या धर्तीवर पुणे विद्यापीठात स्वराज्य महोत्सव साजरा होतोय. याला उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,  चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि विद्यापीठाचे प्र कुलगुरू कार्यक्रमाला उपस्थित होते. 

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, की पुणे विद्यापीठाने पहिला रेकॉर्ड केला तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून आलो होतो. आता तुम्ही दुसरा रेकॉर्ड करताय मी उपमुख्यमंत्री आलोय. पण जेव्हा तिसरा रेकॉर्ड कराल तेव्हा मात्र मला बोलवू नका, मी येणार नाही, असं बोलताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, भाषण संपवताना फडणीसांनी आपल्याच विधानावरून यू टर्न घेतला. पुढच्या कार्यक्रमालाही मला बोलवा, मी कोणत्याही पदावर असलो तरी नक्की येईल, असे म्हणत फडणवीनी सारवासारव केली.
विद्यापीठ हे केवळ शिक्षणामुळे ओळखले जात नाही. तर शिक्षणासोबत ज्ञान वाटप झालं पाहिजे. आपल्याला शिक्षणाकडून ज्ञानाकडे वाटचाल करायची आहे. आम्ही ५० कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला होता. त्यामुळे हरित पट्टा वाढला. त्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा मोठा वाटा होता.
तरुण पिढीवर भाष्य करताना फडवणीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की, ‘भारत हा विश्व गुरू होईल, त्याची वाटचाल आता सुरू झाली आहे’. हे तरुण पिढीला समोर ठेवून पंतप्रधान मोदी बोलतात. आपण सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. आमची युवा पिढी तिरंगा घेऊन सेल्फी घेऊन फोटो अपलोड करेल. याची नोंद गिनीज बुकात घेतली जाईल. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे’.
‘तरुणाई ज्याच्या पाठिशी उभी राहते, ते सर्व यशस्वी होते. राष्ट्रभक्त समाज ज्या देशात असतो, तो देश पुढे जातो. त्यामुळे आपला देश पुढे जात आहे. देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत. १०० व्या वर्षी आम्ही काय करणार यावर मोदी काम करत आहेत. असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading