भारत सरकारच्या मिंट- एसपीएमसीआयएलच्या भागीदारीत एडिशन कॉईन लाँच करण्याची घोषणा
पुणे : भारतीय परंपरेनुसार सोने हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. सोन्याच्या मूल्याच्या टिकाऊपणामुळे त्याची विश्वासार्हता आणि मोहकता दिसून येते. त्याच्या आंतरिक तरलतेमुळे, गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे.
भारताचा नंबर १ गोल्ड प्लॅटफॉर्म असलेला ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑल ही लाखो ग्राहकांचा विश्वास असलेली सर्वांसाठी एकच जागा आहे. भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्याचा एक भाग म्हणून नवीन २४ कॅरेट लिमिटेड एडिशन कॉईन लाँच करण्याची घोषणा त्यांनी अलीकडेच केली. एसपीएमसीआयएलचा भाग असलेल्या इंडिया गव्हर्नमेंट मिंटने (आयजीएम) या नाण्याची निर्मिती केली आहे. देशाची सुरक्षा छपाई आणि टांकसाळीचे व्यवस्थापन करण्याचा दीर्घ आणि गौरवशाली इतिहास असलेल्या विभागांचा एसपीएमसीआयएलमध्ये समावेश आहे. कलकत्ता येथील टांकसाळीत नाणी पाडण्यापासून १८ व्या शतकात या सर्वाची सुरूवात झाली. या नवीन नाण्याच्या लाँचमधून सरदार वल्लभभाई पटेल (लोहपुरूष) यांचा वारसा जपण्याचा ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑलचा दृष्टिकोन दिसून येतो. याशिवाय, एक भारत श्रेष्ठ भारत या विचाराने विस्तार करण्याच्या दृष्टीने ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑलने भारताची महानता आणि प्रवृत्ती दर्शवणारा एक देशभक्तीपर व्हिडिओ जारी केला आहे.
हे प्रतिष्ठेचे लिमिटेड एडिशन नाणे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांची वचनबद्धता, धडाडी आणि आव्हाने स्वीकारणारे खंबीर मन यांच्या सन्मानार्थ समर्पित करण्यात आले आहे. नाण्याच्या पुढील बाजूस स्टॅच्यू ऑफ युनिटी कोरलेले आहे तर उलट बाजूस आझादी का अमृत महोत्सवाचा लोगो आहे. हे २४ कॅरेट सोन्याचे नाणे ९९९ शुद्धतेचे असून टेम्पर-प्रूफ ब्लिस्टर पॅकेजिंगमध्ये त्याचे वजन ७.५ ग्रॅम आहे. या नाण्यासोबत भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा एक स्क्रोल आणि भारताच्या ७५ गौरवशाली वर्षांचे वर्णन करणारे पुस्तक आहे.
ऑगमाँट गोल्डचे संचालक केतन कोठारी म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांच्या वैभवाचा उत्सव साजरा करणारे नाणे सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. एसपीएमसीआयएलचा भाग असलेल्या इंडिया गव्हर्नमेंट मिंटने (आयजीएम) अचूकतेने त्याची निर्मिती केली आहे. या नाण्यात एक मोहक, सुटसुटीत, प्रीमियम आणि तरीही खरोखर भारतीय डिझाइन आहे. त्यामुळे आपल्या प्रियजनांसाठी ही एक परिपूर्ण स्मरणीय भेटवस्तू आहे. भरवसा, चोख किंमत आणि ग्राहक सेवेचा पर्याय म्हणून ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑल कायम राहील.”
