Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नितेश राणे म्हणाले राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही.

मुंबई – मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

चौक नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लव्हेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपालांच्या आर्थिक राजधानी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भाजप नेते नितेश राणे यांनी विरोधकांच्या टीकेवर प्रतिउत्तर देत राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची पाठराखण केली आहे.

नितेश राणे यांनी ट्विट केले आहे की,’मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही.. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे.. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading