Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्याचे दोघांचेच ‘मंत्रीमंडळ कामकाज’ अघिकृत आहे काय..? – गोपाळदादा तिवारी

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व बिन खात्याचे अतिरीक्त मंत्री श्री फडणवीस या ‘दोघांचेच मंत्रीमंडळ बैठकीचे (कॅबिनेट) कामकाज’ अघिकृत आहे काय..? Constitutional Spirit प्रमाणे आहे काय (?).. याचा खुलासा मुख्य सचिवांनी करावा.. अशी मागणी काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!

भाजप प्रणीत शिंदे गटाचे सरकार हे मा एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनीच घेतलेल्या शपथ विधीने सु १ महीन्यापुर्वी अस्तित्वात आले.. मात्र उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक (घटनेतील तरतुदी नुसार) नाही हे स्पष्ट आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांना कोणत्या ही खात्याचा अधिभार (चार्ज) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे कुठेही स्पष्टता नाही.. त्यामुळे “दोघांचे कॅबिनेट मंत्री मंडळ” व त्यात घेतले गेलेले निर्णय हे कायदेशीर व संवैधानिक आहे काय..(?) व घटनेतील ‘कोणत्या तरतुदी नुसार’ (?)… याचा खुलासा राज्याचे मुख्यसचिव वा सचिवालय प्रमुख यांनी जाहीर करावा…अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी निवेदनाद्वारे केली..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading