fbpx

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टर जप्त 

पुणे : दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.(डीएचएफएल) या कंपनीशी संबंधित बँक घोटाळा प्रकरणी या पूर्वीच पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अटक झाली आहे. आज त्यांचे हेलिकॉप्टरही सीबीआयने जप्त केले आहे.

अधिक माहिती असही की, दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.(डीएचएफएल) या कंपनीशी संबंधित तब्बल 34 हजार 615 कोटी रूपयांचा बॅंक घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्या घोटाळ्याशी लागेबांधे असल्यावरून भोसले यांना याआधीच सीबीआयने अटक केली आहे. त्यानंतर सीबीआयकडून विविध ठिकाणी छापासत्र सुरू आहे. अशाच एका छाप्यावेळी भोसले यांचे हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले. ते हेलिकॉप्टर ऑगस्टावेस्टलॅंड कंपनीने बनवलेले आहे. संबंधित घोटाळ्यात 17 बॅंकांना गंडा घालण्यात आला. त्या घोटाळ्यातील बराच पैसा भोसले यांच्या कंपन्यांकडे वळवण्यात आल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, भोसले यांनी लंडनमध्ये 300 कोटी रूपयांची मालमत्ता खरेदी केल्याचेही पुढे आले आहे. संबंधित घोटाळ्याबद्दल सीबीआयने काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला. त्यामध्ये डीएचएफएल, त्या कंपनीचे माजी सीएमडी कपिल वाधवान आणि संचालक दिपक वाधवान यांना आरोपी करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: