…. अखेर संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल
मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची एक ऑडिओक्लिप सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. या कथित ऑडिओक्लिपच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या आज वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून केली आहे. त्यानुसार संजय राऊत यांच्याविरोधात आयपीसी 507 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्पिल व्हायरल होत आहे. या ऑडिओक्लिपमध्ये एक व्यक्ती महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. या ऑडिओक्लिपमधला आवाज हा संजय राऊत यांचाच असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि राऊतांवर कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
