fbpx

‘नेतृत्वाच्या’ बदनामी-कारस्थाना ची जोखिम’ काँग्रेस ला घ्यायची नाही… काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : तथाकथित भ्रष्टाचाराच्या “टुजी स्पेक्ट्रम, कोल घोटाळ्याच्या कथित-आरोपांची किंमत काँग्रेसनेच् नव्हे तर देशाने २०१४ मध्ये चुकवली आहे, त्यामुळे काँग्रेस या पुढे देश, लोकशाही व संविधानाच्या हिता करीताच ‘काँग्रेस नेतृत्वाच्या बदनामीची जोखिम’ घेणार नाही व या ऊद्देशानेच काँग्रेस आपल्या ‘नेतृत्वाच्या मागे’ ठामपणे ऊभी असुन, रस्त्यावर येऊन संघर्षरत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस चे राज्यप्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी डॅा आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय येथील ‘पुणे काँग्रेस च्या सत्त्याग्रह आंदोलनात’ बोलतांना केले…!
स्वातंत्र्य संग्रामाचा दिपस्तंभ असलेल्या नॅशनल होराँल्ड या वृत्त-पत्राच्या तथाकथित घोटाळ्याच्या आरोपाच्या सावटा खाली ‘काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वास’ बदनाम करण्याचे षड्यंत्र ऊधळून लावू व सत्याची कास घरणाऱ्या, नैतिकतेची ऊंची असणाऱ्या व देशास भ्रष्टाचार विरोधात ‘माहीती अधिकार’चे शस्त्र देणाऱ्या काँग्रेस नेतृत्वावर, अर्थात नेहरू – गांधी परीवारावर बदनामीचे सावट येऊ देणार नसल्याचा निग्रह देशातील तमाम काँग्रेसजनांनी केला असल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले…!
काँग्रेस’सह देशातील विरोधी पक्ष संसदेत ‘वाढती महागाई, बेरोजगारी, देशाची सुरक्षा व संरक्षणाच्या प्रश्नांवर’ चर्चा करू पहात आहे, ढासळलेली अर्थव्यवस्थेकडे लक्ष वेधू पहात आहे, मात्र केंद्रातील सत्ताघारी भाजप सरकार या प्रश्नांना सामोरे न जाता ईडी पुढे करून विरोधकांवर निव्वळ संशयग्रस्त आरोप करीत बदनामीचे डावपेच आखत, जनतेत संशय व संभ्रम निर्माण करण्यातच मग्न आहे.. विरोधी आवाज व समोरील विरोधीपक्षाकडून प्रश्न विचारणे बंद झाल्यास आपली पापे झाकली जातील या थाटात केंद्रातील मोदी शहांची ‘भारतीय जुलमी पार्टी’ करत असल्याची कडवट टिका देखील काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी बोलतांना केली..!

पुणे शहर जिल्हा काँग्रेस चे प्रभारी अध्यक्ष श्री अरविंद शिंदे यांचे अध्यक्षते खाली झालेल्या ‘शांततामय सत्त्याग्रह आंदोलनात’ मा राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, रमेशजी बागवे, मोहनजी जोशी, कमल व्यवहारे, अभय छाजेड, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, आबा बागुल, संगिता तिवारी, सौ पुजा आनंद, डॅा जाखीर शेख, अमिर शेख, रजनी त्रिभूवन, लता राजगुरू, अजीत दरेकर, नरूद्दीन सोमजी, रफीक शेख, शानी नौशाद, मिरा ताई शिंदे, भूषण रानभरे, छाया जाधव, गोपाळ पायगुडे इ महीला, युवक, विद्यार्थी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने ऊपस्थित होते…

Leave a Reply

%d bloggers like this: