fbpx

शिंदे गटाला मनसेमध्ये विलीन करण्याच्या प्रस्तावावर विचार करु : राज ठाकरे

मुंबई : शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले.

राज ठाकरे म्हणाले, “ शिवसेनेतील बंडखोर आमदार माझे जुने सहकारी आहेत. याआधी त्यांनी माझ्यासोबत काम केलेले आहे. मला याबद्दल तांत्रिक माहिती नाही. पण उद्या त्यांच्याकडून असा प्रस्ताव आला तर मी नक्की विचार करेन. माझ्यासाठी सर्वप्रथम माझा महाराष्ट्र सैनिक असेल. बाकी सगळे नंतर येतील, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय आणि शिवसेनेचे नेतृत्व यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले. “मी बाळासाहेब ठाकरेंना पत्रंही लिहिली होती. मी फक्त एकच गोष्ट विचारत होतो की माझा जॉब काय आहे? इतरावंर आपण सर्व जबाबदारी देणार आणि निवडणुकीसाठी मला भाषणासाठी बाहेर काढणार. दुसऱ्यांच्या जीवावर मी माझा शब्द टाकत बसायचा हे शक्य नव्हतं. शिवसेना पक्षप्रमुखपदाचा निर्णय बाळासाहेब ठाकरेंचा होता. महाबळेश्वरला असताना मी सांगितलं की मला तुमच्या मनात (बाळासाहेब ठाकरे) काय आहे, हे माहिती आहे. उध्दव ठाकरेंना तुम्ही अध्यक्ष करा. पण जाहीर मला करु द्या. कारण मग राज की उद्धव हा विषय बंद होईल. त्याप्रमाणे मी विषय बंद केला. पश्चात्ताप करण्याचा विषय नव्हता.” असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

%d bloggers like this: