fbpx

थेऊर येथील तलाठी कार्यालयाला कामाच्या दिवशी टाळे

पुणे (थेऊर ) – थेऊर येथील तलाठी व मंडल कार्यालयास शुक्रवारी भर दिवसा ,कोणतीही सुट्टी नसताना कुलूप पाहून नागरिकांची चांगलीच पंचायत झाल्याचे दिसले .तलाठी , मंडल अधिकारी कोनीच उपस्थित नव्हते ,विशेष बाब म्हणजे चक्क कार्यालयास टाळे लावले होते .त्यामुळे याबाबत कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अतुल बहुले यांनी केली आहे .
याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सदर बाब लक्षात आणून दिली आहे .आता याबत वंचित बहुजन आघाडीने कारवाई करण्याची व अशा अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी करीत असल्याचे अतुल बहूले यांनी सांगितले आहे .
सदर बाब जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तहसिलदार याच्या निदर्शनास आणून दिली . प्रशासन काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थ नागरिकांचे लक्ष लागून राहीले आहे .

Leave a Reply

%d bloggers like this: