fbpx

एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसंबंधीच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही – दिलीप वळसे-पाटील

पुणे:नक्षलवाद्यांकडून गडचिरोलीचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांचा खून करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी केला. शिंदे यांना धमकी दिली गेल्यानंतर त्यांनी झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन सुरक्षा देऊ नका, असा गंभीर आरोप सुहास कांदे आणि शंभुराज देसाई यांनी केला होता. तसेच ठाकरे यांनी सुरक्षा दिली नाही, असे सूचक वक्तव्य सीएम शिंदे यांनी केले. याला आता तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

मुळात असं काहीही नाही. त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. उच्चस्तरीय समितीच्या सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेत असते. तसेच त्यांनी तशी मागणी केलेली नव्हती. असे वळसे-पाटील म्हणाले.आज पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दिलीप वळसे पाटील म्हणाले,सार्वजनिक जीवनात काम करताना अशा धमकीची पत्र येत असतात. याबाबत पोलीस तपास करतात. त्याचे गांभीर्यही लक्षात घेतले जाते. त्यानंतर चौकशी होते. या चौकशीनंतर उच्चस्तरीय समिती ठरवते. असे असले तरी  एकनाथ शिंदे यांना पुरेशी सुरक्षा देण्यात आली होती. त्यांनी सुरक्षेची मागणी केली नव्हती. परंतु त्यांच्या मुलाने पत्र लिहून झेड प्लस सुरक्षा मागितली होती. पण एकनाथ शिंदेंकडून स्वतः कधीच सुरक्षेची मागणी करण्यात आली नव्हती.  शिंदेंना आलेल्या  धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका, अशा कोणत्याही सूचना नव्हत्या, असे वळसे -पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: