fbpx

महिलांनी स्वयंपूर्ण झाले पाहिजे – निलम शेवलेकर

पुणे – .महिलांनी कला कौशल्य शिका व आर्थिक स्वयंपूर्ण व्हा असा संदेश फिकी फ्लो पुणे च्या अध्यक्षा नीलम सेवलेकर यांनी लवळे येथील महिलांना दिला. 22 जुलै पासून तीन दिवस चालणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन ग्रामपंचायत लवळे ,ऑक्सफर्ड गोल्फ, फिकी फ्लो पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशिक्षणासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यात येईल असे सरपंच निलेश भाऊ गावडे यांनी यावेळी सांगितले. मा. सरपंच वैशालीताई सातव यांनी ऑक्सफर्ड गोल्फ, फिक्की फ्लो व फ्लेम युनिव्हर्सिटी या संस्थांनी महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळवून द्यावी अशी मागणी केली. याप्रसंगी ग्राम विकास अधिकारी साकोरे भाऊसाहेब , ग्रामपंचायत सदस्य किमया गावडे, सायली ताई सातव , राणी केदारी , वर्षा राऊत , अमोल सातव उपस्थित होते .सूत्रसंचालन मा. सरपंच , वि सदस्य संजय आबा सातव यांनी केले .उपसरपंच रंजीत राऊत यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: