ठाकरेंनी सांगितलं तुम्हांला योग्य वाटेल ते करा मग मी निर्णय घेतला – खासदार श्रीरंग बारणे
पुणे : एकनाथ शिंदे गटातगेलेले शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचं विमानतळावर जोरदार स्वागत झालं.
बारणे यांचे समर्थक मोठ्या संख्येने पुणे विमानतळावर जमले होते. दिल्लीहून पुण्यात पोहोचतात श्रीरंग बारणे यांनी त्यांची शिंदे गटात जाण्याविषयीची भूमिका स्पष्ट केली. भाजप सोबत युती पाहीजे ही आमची भूमिका होती, वारंवार ही मागणी केली. मात्र मविआ आली. राष्ट्रवादीला सेनेला संपवायचं आहे म्हणून हे पाऊल उचललं. मी मावळ मध्ये पवार परिवारातल्या माणसालाला मोठ्या मताधिक्याने हरवलं. शिंदे सोबत जाण्याबाबत ठाकरेंना मेसेज केला. त्यांचा फोन आला. त्यात युतीची मागणी केली. शिवसंपर्कचा अहवाल देखील दिला त्यात सुद्धा ही मागणी पुढे आली होती, उद्धव ठाकरेंशी शेवटपर्यंत चर्चा करत होतो. मात्र त्यांनी सांगितलं तुम्हांला योग्य वाटेल ते करा मग शिंदे गटात जायचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण बारणे यांनी दिलं आहे.
श्रीरंग बारणे म्हणाले, ‘सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप-शिवसेनेची युती झाली पाहिजे. या मताशी लोकसभेतील 12 खासदार सहमत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही ही भूमिका मांडली. 2019 च्या निवडणुकीत मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता. नंतरच्या कालावधीत महाविकास आघाडी झाली. परंतु, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेनेला संपवू पाहत आहे. त्यादृष्टीकोनातून शिंदे यांनी शिवसेनेबाबत घेतलेली भूमिका आणि उचललेले पाऊल याचे आम्ही समर्थन केले आहे. .दरम्यान, आमचा कोणताही गैरव्यवहार नाही. आम्ही कसल्याही यंत्रणांना घाबरत नाही. असंही त्यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांचा पक्षप्रमुख होण्याबाबत कोणताही मनोदय नाही. न्यायालयात निर्णय विरोधात गेला तर काय, याबाबत विचारले असता खासदार बारणे म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला जाईल. परंतु, महाविकास आघाडी सरकारकडून खासदारांना कोणतेही सहकार्य मिळत नव्हते. परंतु, राष्ट्रवादी सर्वाधिक निधीचा वापर करत होता. जोपर्यंत युतीत सहभागी होतो, तोपर्यंत केंद्राकडून चांगले सहकार्य मिळत होते. महाविकास आघाडी झाल्यानंतर सहकार्य मिळत नव्हते. संजय राऊत यांच्याबात पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली होती. रोज उठून कोणाच्या घरावर दगड मारण्याची आवश्यकता नसते. ते आपल्या संस्कृतीला शोभत नाही. 2024 ची निवडणूक कोणाकडून लढविणार याबाबत विचारले असता ते म्हणाले, एकनाथ शिंदे युतीच्या माध्यमातून त्याबाबत निर्णय घेतील. 2024 मध्ये मी मावळातून उमेदवार असणार आहे’.
