fbpx

राईट टू प्रोटीनतर्फे सोया फेड मेनू बनविण्यासाठी १०० हून अधिक रेस्टॉरंट्स बरोबर भागीदारी

पुणे : उच्च दर्जाच्या प्रथिनयुक्त अन्न पदार्थांबद्दल ग्राहकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने प्रथिनांचा अधिकार (राईट टू प्रोटीनया देशव्यापी सार्वजनिक आरोग्य उपक्रमांतर्गत १०० हून अधिक रेस्टॉरंट्स सहकार्य करून उच्च दर्जाच्या पोल्ट्रीपासून बनवलेले पदार्थ पुरवत आहेयात खास तयार केलेले भरपूर प्रथिने असलेले सोयाबीनचे अन्नपदार्थ प्रदान करण्यात येतातभारतातील १५ शहरांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांत ओयेकिड्डनसुपर बाऊलबर्ग्रिलसरदाजी लंडनवालेपंजाबी नवाबीफार्महाऊस यांसारख्या रेस्टॉरंट चेन कस्टमाईज्ड ‘सोया फेड‘ मेनू तयार करण्यात येणार आहे .झोमॅटो आणि स्विगी यांसारख्या आघाडीच्या फूड ऑर्डरिंग ॲप्सवर देखील हे पदार्थ उपलब्ध होणार आहेत .

सोयाबीनयुक्त जेवण हे पशुधनकुक्कुटपालन आणि जलचर प्राणी यांच्या आहारातील प्रथिनाचे प्रमुख प्रथिन स्त्रोत आहेत्यातून संतुलित अमीनो ऍसिड प्रोफाइल आणि वनस्पतीआधारित प्रथिनांच्या स्त्रोतांमध्ये उच्च पातळीची पचनक्षमता मिळतेसोयाबीनच्या जेवणातील परिपूर्ण पौष्टिक मूल्यांमुळे प्राण्यांचे आरोग्य कायम राहण्यास मदत मिळतेत्यामुळे प्राण्यांच्या प्रथिने उत्पादनांसाठी भारतातील पहिले स्वैच्छिक फीड लेबल असलेल्या ‘सोया फेड लेबल इंडियाच्या सादरीकरणानंतर देशभरातील रेस्टॉरंट्ससह ‘सोया फेड‘ मेनू हा ग्राहकांना दर्जेदार प्रथिने ओळखण्यासाठी आणि निवडण्याच्या दिशेने ‘राइट टू प्रोटीनचे पुढचे पाऊल आहे.

यूएस सोयाबीन एक्सपोर्ट कौन्सिल (यूएसएसईसीइंडियाचे प्रमुख आणि राईट टू प्रोटीनचे समर्थक असलेले जेसन जॉन म्हणाले की “आम्ही मानवांसाठी तसेच प्राण्यांसाठी पोषणाचा एक शाश्वत स्रोत म्हणून सोयाच्या भूमिकेबद्दल जागरुकता वाढवत असताना भारतातील पहिली फीड लेबल असण्यापासून ते आता एक नवीन मेनू बनण्यापर्यंतची सोया फेडची वाटचाल पाहून आनंद होत आहेउत्तम आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी पुरेशा प्रथिनांचे सेवन करण्याच्या महत्त्वाविषयी लोकांना जागरूक करण्याच्या आमच्या मिशनमध्ये आम्ही अथक प्रयत्न करत राहू.”

ओयेकिड्डनचे मालक गुरमीत कोचर म्हणाले की  आमच्या सर्व ग्राहकांना सर्वात पौष्टिक अन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत आलो आहोतया मेनूद्वारे उच्च दर्जाच्या प्रोटीनवरील त्यांच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना मदत करण्याच्या दिशेने आम्ही एक पाऊल पुढे गेलो आहोतया जागरूकतेच्या चळवळीत सहभागी होण्याचा आम्हाला आनंदच आहेत्यातून आमचे ग्राहक अन्नाकडे कुठल्या दृष्टीने पाहतात आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी अधिक सक्षम होतात यात आमूलाग्र बदल घडून येईल. 

Leave a Reply

%d bloggers like this: