fbpx

एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांची घेतली भेट

 

नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत शिवसेनेच्या (शिंदे गट) 12 खासदारांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतली.

शिवसेनेतील बंडखोर खासदारांकडून आता वेगळा गट स्थापन करण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटात सामिल झालेल्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा केली आहे. शिंदे गटाने दिलेल्या पत्रात लोकसभा सचिवालयाने बदल सुचवले आहेत. त्यामुळे आता हे पत्र आज संध्याकाळी अथवा उद्या लोकसभा अध्यक्षांना दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बाजूला सारुन एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. 

शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले.  शिवसेनेचे फक्त 14 नव्हे तर 18 खासदार आपलेच आहेत. सर्वजण येणार असून आपण त्यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सध्या खुप चर्चा सुरु आहे पण मला अद्याप काही माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. खासदारांसोबत भेट झाल्यानंतर अधिक माहिती देऊ असेही त्यांनी सांगितले. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आमच्याकडे बहुमत असून सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूने निकाल येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

Leave a Reply

%d bloggers like this: