fbpx

डेल्टाने ६,००० हून अधिक ईव्ही चार्जर्स वितरित केले

मुंबई : डेल्टा या ऊर्जा व थर्मल व्‍यवस्‍थापन सोल्यूशन्समधील जागतिक अग्रणी कंपनीने आज घोषणा केली की, कंपनीने भारतातील ग्राहकांना ६,००० हून अधिक इलेक्ट्रिक वेईकल (ईव्ही) चार्जर्स वितरित केले आहेत. हा देशातील ई-मोबिलिटी परिवर्तनाला चालना देणारा लक्षणीय सुवर्ण टप्‍पा आहे. टाटा पॉवर, बेंगहुरू इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लि. (बीईएससीओएम), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल) आणि एनर्जी एफिशिएन्सी सर्विसेस लि. (ईईएसएल), तसेच विविध ओईएम अशा प्रमुख चार्ज पॉइण्ट ऑपरेटर्सचा समावेश असलेल्या ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा विभागामधील प्रमुख भागधारक व डेल्टामधील सहयोगामुळे हा उल्लेखनीय टप्पा शक्य झाला आहे. डेल्टाचा भारतभरात ऊर्जा-बचत करणारे सोल्यूशन्स समाविष्ट करण्याचा अद्वितीय ट्रॅक रेकॉर्ड आणि त्यांच्या ईव्ही चार्जर पोर्टफोलिओच्या उच्च दर्जाच्या क्षमता व प्रकार देशातील पसंतीचे ईव्ही चार्जिंग सोल्यूशन सहयोगी बनण्यामध्ये त्यांच्या यशामधील महत्त्वपूर्ण भाग राहिले आहेत.

डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे अध्यक्ष व महा-व्यवस्थापक बेंजामिन लिन म्हणाले, “भारताच्या शाश्वत भविष्याचा एक प्रमुख आधारस्तंभ असलेल्या ई-मोबिलिटीच्या निर्मितीसाठी आम्ही अथक सहकार्य करत असलेले आमचे स्थानिक भागीदार आणि सरकारी संस्था यांचे मनापासून आभार मानतो. ‘उज्ज्वल भविष्यासाठी नाविन्यपूर्ण, शुद्ध आणि ऊर्जा-कार्यक्षम उपाय प्रदान करणे’ या कॉर्पोरेट मिशनचे मार्गदर्शन असलेली डेल्टा पर्यावरणपूरक व आरोग्यदायी इमारती, हरित ऊर्जा पायाभूत सुविधा, स्मार्ट कारखाने, पर्यावरणास अनुकूल आयसीटी पायाभूत सुविधा, तसेच ई-मोबिलिटी यांसारख्या शहरांचा शाश्वत पाया विकसित करण्याचा प्रयत्न करते. आम्ही स्थानिक उत्पादन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सरकारी उपक्रमांचे देखील स्वागत करतो आणि खरेतर, डेल्टा इंडियाच्या आरअॅण्डडी आणि अभियांत्रिकी टीम अधिकाधिक स्वदेशी उपायांवर काम करत आहेत, जसे की इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बॅटरी स्वॅपिंग सिस्टम, तसेच वेगवान ईव्ही चार्जर्स. आमच्या उत्पादनाची स्थानिक सामग्री आणि सोल्यूशन ऑफर काही वर्षांत ८० टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्याचा आमचा मनसुबा आहे.”

डेल्टा ईव्ही चार्जर प्रदातावरून एकूण सोल्यूशन सहयोगीपर्यंत विकसित झाली आहे. भारतातील ईव्ही चार्जिंग उत्पादने व सोल्यूशन्समध्ये सतत सुधारणा आणि अपग्रेड यामधून डेल्टाचे ओईएम, सीपीओ व इतर भागधारकांसोबत धोरणात्मक सहयोग करण्यावर लक्ष केंद्रित असल्याचे दिसून येते. काही यशस्वी सहयोग म्हणजे डेल्टाने आतापर्यंत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला करारानुसार १००० हून अधिक चार्जर्सचा पुरवठा केला आहे, ईईएसएल (सीईएसएल) द्वारे संचालित अनेक साइट्ससाठी ६०हून अधिक ईव्ही चार्जर्स स्थापित केले आहेत आणि बीईएससीओएल (बेंगळुरू पॉवर युटिलिटी ऑर्गनायझेशन) ला ११४ ईव्ही चार्जर्सचा पुरवठा केला आहे. तसेच एकाच साइटमध्ये भारतातील सर्वात मोठ्या बस आईएम्‍सपैकी एकासाठी ११ जलद चार्जर्स आहेत, तसेच राज्यभर तैनात असलेल्या केरळ राज्य युटिलिटी कंपनीला ईव्ही चार्जर्सचा पोर्टफोलिओ देखील पुरवला आहे.

डेल्टा ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी एक-थांबा सोल्यूशन देते, साइट सर्वेक्षणापासून ते तपशील, इन्स्टॉलेशन आणि विक्रीनंतरची सेवा डिझाइन करणे अशा बाबींचा त्‍यामध्ये समावेश आहे. तसेच डेल्टा ही भारतातील सौर पीव्ही इनव्हर्टर्स, एनर्जी स्टोरेज सिस्टिम्‍स व ऊर्जा व्यवस्थापन सॉफ्टवेअरसह बेंगळुरू युटिलिटी कंपनीला पूर्णत: एकीकृत ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्स प्रदान करणा-यांपैकी एक आहे. राष्‍ट्रीय विकास उपक्रम ‘मेक इन इंडिया’शी संलग्न राहत डेल्टा भारतातील त्यांच्या आरअॅण्डडी व उत्पादन क्षमता वाढवत आहे, ज्यामध्ये देशातील त्यांच्या उत्पादनांची ५० टक्क्यांहून अधिक सामग्री स्थानिक पातळीवर उत्पादित करण्यात येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: