fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Pandharpur – श्री विठ्ठल आश्रम मध्ये 40 भाविकांना अन्नातून विषबाधा; राज्याच्या विविध भागातील विद्यार्थी

पंढरपूर:   येथील श्री विठ्ठल आश्रम मध्ये  40 भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. दुपारच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचं स्पष्ट झाले आहे.  या सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. हे जेवण एकूण 100 भाविकांनी घेतल्याचं समोर आलं असून त्यामध्ये लहान बालकांचाही समावेश आहे.

दुपारच्या जेवणामध्ये बासुंदी, पत्ता कोबी, बेसन, चपाती, भजे,  याचा समावेश होता. संध्याकाळी 7 दरम्यान आश्रममधील भाविकांना उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयामध्ये आणण्यात आले. यामध्ये दहा ते पंधरा भाविक अतिदक्षता विभागमध्ये आहेत. सध्या पंढरपूर सामान्य रुग्णालयमध्ये आणखीन रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याची माहिती उपजिल्हा डॉक्टर अरविंद गिराम  वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

हे सर्व भाविक श्री विठ्ठल आश्रममध्ये संप्रदायक शिक्षण घेत आहेत, हे सर्व स्थानिक आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. यामध्ये बाधा झालेले असे प्रदीप विठ्ठल शिरोळे, सुदर्शन सगळे, ओंकार निर्मले, प्रणव शिंदे, पवन सुलतानी, दर्शन जाधव,  गोरख  जयभद्र, विनायक नाडे, वैभव कुंभार, आदिनाथ मालकर,  केशव पवार,  अभिजीत शिंदे, लक्ष्मण फुके,  ऋषिकेश कोल्हे, नितीन गव्हाड, ऋषिकेश तांबे, अर्जुन पवार, गणेश राहणे, प्रताप गीते, ऋषिकेश चव्हाण, अभिषेक मोरे,  करण परदेशी, स्वागत गाजरे, हरिशचंद्र लोखंडे, अतुल सुरवसे, वैभव शेटे, माऊली गवाड अशी नावे आहेत.

हे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत यामध्ये पळसगाव, निमगाव, हळेगाव, वैजापूर, तळोशी, ढाणगाव दौंड,  परभणी,  कोल्हापूर , शेळवे पंढरपूर,  पाटणे , जालना , सिंदखेड , सावरखेड , नाशिक,  ढवळगाव , कोपरगाव , जालना,  पैठण,  दौंड याठिकांचे आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: