Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘गद्दार’ म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा” बंडखोर आमदार संतोष बांगर यांची धमकी

हिंगोली : उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदे आणि ३८ आमदारांनी बंडखोरी केली म्हणून ठाकरेंसाठी अश्रू गाळत बंद्खोरांविषयी स्वतः टीका करणारे आणि नंतर त्याच बंडखोरांना जाऊन मिळणारे कळमनूरी चे  बंडखोर आमदार संतोष बांगरांनी मोठे  विधान करून आपल्या समर्थकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी बंडखोर आमदारांना ‘गद्दार’ म्हणत आहेत. याच मुद्द्यावरून बंडखोर आमदार संतोष बांगर यांनीहे विधान केलं आहे.ते हिंगोली येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

जर तुम्हाला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा, असं संतोष बांगर यांनी उपस्थित शिवसैनिकांना मोठ्केया जोरदार आवाजात सुनावलं आहे. दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “आपण शिवसैनिक आहोत. जर आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी करावं. आम्ही भिणारे शिवसैनिक नाहीत. आमच्या हातामध्ये बांगड्या नाहीयेत. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला जर कुणी आरे म्हटलं तर त्याला कारे नाही, पण कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही, असे आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत, हे ध्यानात ठेवा” असा धमकीवजा इशारा बांगर यांनी दिला आहे.

खरंतर, बंडखोरी झाल्यानंतर सुरुवातीला संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. बंडखोरी झाल्याची बातमी समजल्यानंतर बांगर यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियात ‘निष्ठेचा नांगर, संतोष बांगर’ अशी मोहीम देखील पाहायला मिळाली होती.पण यानंतर अवघ्या काही दिवसांत संतोष बांगर यांनी आपल्या विधानापासून यू-टर्न घेत शिंदे गटात सामील झाले. शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून बंडखोर आमदारांना गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढण्याचं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading