fbpx

गुरुतत्त्वाकडून शब्दाविना मार्गदर्शन : अभयकुमार सरदार

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुतत्त्वयोग संस्थेत कार्यक्रम : गुरुतत्त्ववेध स्मरणिकेचे प्रकाशन

पुणे : विश्वातील प्रत्येक घटकाला गुरुतत्त्व मार्गदर्शन करीत असते. गुरू-शिष्य परंपरेत गुरू शिष्याला शिकवत असतोपण गुरुतत्त्वाचे वेगळेपण हे आहे कीते शिष्याला शिकवित नाही तर शिष्याने गुरुतत्त्वस्वरूप गुरूकडून शब्दाविना शिकायचे असतेअसे प्रतिपादन गुरुतत्त्वयोग तत्त्वप्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी केले.

गुरुतत्त्वयोग ध्यानमंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त सामूहिक ध्यानधारणाअनुभव कथन आणि स्मरणिका प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सरदार यांनी साधकांना गुरुतत्त्व तत्त्वज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणालेविश्वातील प्रत्येक घटकाला गुरुतत्त्व मार्गदर्शन करीत असते. प्राणिमात्रजीवजंतूवनस्पतींनी गुरुतत्त्वयोग साधला आहे. गुरुतत्त्वाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाला शब्दांची आवश्यकता भासत नाही. सृष्टीतील प्रत्येक घटकाकडून मानवाला मार्गदर्शन मिळत असते हे समजून उमजून घेतले तर मानवाला त्याचे आकलन होते. प्रत्येक क्षणप्रत्येक प्रसंग आपल्याला शिकवित असतात. सृष्टीतील सजीव घटक ज्या प्रमाणे शब्दाविना शिकत असतातसुसंवाद ठेवतात त्याप्रमाणे मानवानेही गुरुतत्त्वाकडून शब्दाविना मार्गदर्शन मिळविणे आवश्यक आहे.

गुरुतत्त्ववेध स्मरणिकेचे प्रकाशन अभयकुमार सरदारतेजा दिवाणसाधना कुलकर्णीयोगिता कामटे आणि उमा शिंदे यांच्या हस्ते झाले. गुरुतत्त्वाच्या सान्निध्यात आल्यानंतर गुरुतत्त्वाकडून कशापद्धतीने मार्गदर्शन मिळत गेले याविषयी उमा शिंदे आणि साधना कुलकर्णी यांनी अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या विश्वस्त तेजा दिवाण यांनी केले.

मानव खरंच सर्वात बुद्धिमान आहे का?

सृष्टीतील प्रत्येक घटकाशी गुरुतत्त्वाद्वारे शब्दाविना साधला जाणारा सुसंवाद या अनुरोधाने प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. सृष्टीतील मानव हाच सर्वात बुद्धिमान प्राणी आहे का कीइतर सजीव घटकयाचा उलगडा चित्रप्रदर्शनातून करण्यात आला. मानव शेती करू लागला त्याच्या आधीपासून मुंग्या करीत असलेली शेती आणि वाळवीच्या वारुळाची रचना याविषयी अभ्यासपूर्ण मांडणी प्रदर्शनाद्वारे करण्यात आली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: