इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीच्या विद्यार्थिनींना सिडेस्को परीक्षेत यश
पुणे : इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीच्या अकरा विद्यार्थिनींनी सिडको परीक्षा पास केली. या 11 विद्यार्थिनींचा पदवी प्रदान कार्यक्रम आणि माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा नुकताच पीवायसी, डेक्कन जिमखाना, पुणे येथे पार पडला. सिडेस्को परीक्षा ही ब्युटी क्षेत्रातील जागतिक उच्च दर्जाची परीक्षा मानली जाते. ही परीक्षा इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीच्या अकरा विद्यार्थ्यांनी पास केली आहे. ह्या अकरा विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी पुष्पा भगत, सुहास भगत, अकॅडमी च्या संचालिका कल्याणी उमराणी आणि विविध मान्यवर, कर्मचारी वर्ग उपास्थित होते.
सिडेको संलग्न इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमी ही गेली 25 वर्षे ब्युटी क्षेत्रात कार्यरत आहे. या अकॅडमीत विद्यार्थिनींना जागतिक दर्जाचे शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते. या अकॅडमीच्या माध्यमातून डिप्लोमा इन प्रोफेशनल ब्युटी थेरपी डिप्लोमा इन कॉस्मेटोलॉजी आणि डिप्लोमा इन सलून मॅनेजमेंट असे विविध कोर्सेस चालवले जातात अकॅडमीच्या संचालिका कल्याणी उमराणी या ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल बोर्डच्या सदस्य आहेत.
इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमी तर्फे सध्या ब्युटी क्षेत्रात यशस्वी उद्योजिका म्हणून कार्यरत माजी विद्यार्थिनींचा देखील विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या पदवी प्रदान समारंभात सिडको पास विद्यार्थिनींनी आणि उपस्थिती माजी विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी मिताली मोरे, फॅशन मॉडेल श्रुती पाटोळे उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन लाईफ कोच आणि फॅशन मॉडेल डॉ. प्रचिती पुंडे यांनी केले.
