‘पंचतत्व’ नृत्य बॅलेचे अप्रतिम सादरीकरण
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘ पंचतत्त्व ‘ या नृत्य बॅले कार्यक्रमाला शनिवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. नृत्यनिलय अकादमी प्रस्तुत हा बॅले स्वरूपा उटगी यांच्या शिष्यानी सादर केला. हा कार्यक्रम १६ जुलै रोजी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला. नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश या पंचतत्वांचा मनुष्य जीवनावर कसा परिणाम होतो. आणि या पंचतत्वाचे संतुलन बिघडले तर या सृष्टीचा नाश होऊ शकतो, याचे अप्रतिम सादरीकरण या नृत्य बॅलेतून दाखविण्यात आले.
नृत्य बॅले मध्ये सौ.प्राची नारगोळकर,सौ.स्वानंदी शुक्ल,सौ.अनुज करमरकर,सौ.सृष्टी जोशी,सौ.अनुश्री गोडबोले सहभागी होणार आहेत.स्नेहल झंवर,हीर देढिया,सायंती शारंगपाणी,कोहशिन रैना,गायत्री बारटक्के सहभागी झाल्या होत्या . सूत्रसंचालन अश्विनी पळणीटकर यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नॅक चे अध्यक्ष आणि युजीसीचे माजी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कलाकारांचा प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरी देऊन सत्कार करण्यात आला.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १३० वा कार्यक्रम होता .