fbpx
Thursday, September 28, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

Rain Alert – पुण्याला पुढील 48 तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा; घराबाहेर न पाडण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : शहर व जिल्ह्यात गेल्या आठवड्या पासून जोरदार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पाऊस लोणावळा परिसरात सुरू आहे. या सोबतच खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ तालुक्यातही जोरदार पाऊस बरसतोय. दरम्यान, हवामान विभागाने या तालुक्यात असणा-या घाटमाथा परिसरात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तास हे पुणे जिल्हयासाठी महत्वाचे राहणार आहे. या पावसामुळे घाटात दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येते दोन दिवस बाहेर न पडण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.

दरम्यान, पुणे शहरातही यलो लर्ट हवामान विभागाने सांगितला आहे. पावसामुळे झाडपडीच्या घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेर न पडता घरीच राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे पुण्यातील धरणे जवळपास निम्मे भरली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही धरणे वेगाने भरली आहेत. पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसरातच ही धरणे असल्याने लवकरच ही धरणे पूर्ण भरणार आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडले जाणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, पुढील 48 तासात हा मुसळधार पाऊस पुण्यासह मुंबई आणि घाटमाथ्यावर होणार आहे. तर 5 तारखे पासून पाऊस कमी होईल. तर त्यानंतर16 जुलैपासून वातावरणात पुन्हा बदल होऊन पावसाची परिस्थिती निर्माण होईल. मध्यम ते मुसळधार असा हा पाऊस असेल. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक या चार ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असे अनुपम कश्यपी यांनी सांगितले. कोकण, गोवा, पालघर, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचे ते म्हणाले. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रवास करणे टाळावे. विशेषत: घाट माथ्याच्या परिसरातून प्रवास करू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: