fbpx

पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात शाळांना शनिवार पर्यंत सुट्टी

पुणे : शहर आणि जिल्ह्यात उद्या गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं जारी केलेल्या रेड अलर्टमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आता शनिवार पुणे ग्रामीण भागातील काही तालुक्यात 12 वी पर्यंत च्या शाळांना सुट्टी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.

पुण्यात १४ जुलैरोजी हवामान खात्याने मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या सोबतच रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालीकेने सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये इंदापूर, दौंड, बारामती, शिरूर आणि पुरंदर तालुके वगळून सर्व जिल्ह्यात शनिवार दी. 16 जुयलाई 2022 पर्यंत प्री प्रायमरी, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना वरील कालावधीत सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: