fbpx

खडकवासला धरणात 94 टक्के पाणीसाठा, मुठेतला विसर्ग 3424 क्युसेक

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे. यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 2568 क्युसेक विसर्ग वाढवून ठीक मंगळवारी सकाळी 10.00 वा. 3424 क्युसेक करण्यातआला आहे.तसेच खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढवून दुपारी १२ वाजता ५९९२ क्युसेक करण्यात येत आहे.

गत वर्षी याच दिवशी असलेल्या पाणी साठ्या पेक्षा बरेच जास्त यावेळी पाणी साठा झालेला आहे.गत वर्षी चारही धरणात मिळून 8.62 TMC एवढे पाणी होते म्हणजे एकूण पाणी साठा. 29.56% एवढा होता तो आज 10.79 TMC/37.01% एवढा झाला आहे.खडकवासल्यातून उजव्या कालव्यात 905 क्यूसेस एवढे पाणी सोडले जात आहे तर नदीत 2568 क्यूसेस. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 60 मिमी पावसाची नोंद झाली आजवर एकूण पाऊस 225 मिमी एवढा झाला आहे .या धरणात 1.86 टीएमसी एवढा म्हणजे 94.08 %एवढा पाणी साठा झाला आहे.

पानशेत मध्ये आजवर 888 मिमी पावसाची नोंद झाली हे धरण 35.82 टक्के भरले आहे.

वरसगाव मध्ये आजवर 853 पावसाची नोंद झाली आहे या धरणात एकूण पाणीसाठा 4.30 टीएमसी म्हणजे 33.58 % एवढा झाला आहे.

टेमघर मध्ये आजवर 1013 मिमी पावसाची नोंद झाली आहे या धरणात एकूण पाणीसाठा 0.81 टीएमसी म्हणजे 21.88 एवढा झाला आहे.

दरम्यान, खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढवून दुपारी १२ वाजता ५९९२ क्युसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: