Pune – घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी
पुणे : जिल्ह्यात घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळतीय. भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यात रात्रीपासून पावसाचा जोर अधिक आहे. मुळशी तालुक्यातल्या धावडी येथे सर्वाधिक 208 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय, तर भोर मधील पांगरी गावात 193 मिलीमीटर इतकी पाऊस पडला आहेत.मागच्या काही तासात पुणे जिल्ह्यात भोर, वेल्हा, मुळशी येथे किती पावसाची नोंद झाली पाहूयात,
मुळशी तालुका
धावडी 208 mm
कुंभेरी 196 mm
भोर तालुका
पांगारी 193 mm
शिरगाव 180 mm
भुतोंडे 146 mm
हिर्डोशी 141 mm
शिरवली 155 mm
वेल्हा तालुका
वेल्हा 101 mm
गिसर 141 mm
दासवे वरसगाव 180 mm
पानशेत 121 MM
इतकी पावसाची नोंद झालीयं.पुढचे दोन दिवस पुणे जिल्यातल्या घाट माथ्यावर असल्यानं, प्रशासनाकडून दक्ष राहणाच्या सूचना देण्यात आल्यात.