fbpx

आम्हाला सन्मानपूर्वक मातोश्रीवर बोलवल्यास आम्ही जायला तयार – आमदार संतोष बांगर

हिंगोली : शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी करत शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मातोश्रीवर बोलावलं, तर नक्की जाऊ, असं विधान शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे.

मातोश्रीवरील आमचं प्रेम अद्यापही कायम आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं. आजही उद्धव ठाकरेंबाबत आम्हाला आदर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सन्मानपूर्वक मातोश्रीवर बोलवल्यास आम्ही जायला तयार आहोत, असं संतोष बांगर म्हणाले.

मातोश्रीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि पुन्हा शिवसेना आणि भाजपाची युती झाली, तर प्रत्येक शिवसैनिकाला त्याचा आनंद होईल. आम्हाला नोटीसा पाठवल्या आहेत. मात्र चिंता नाही. न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, असं संतोष बांगर म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: