fbpx

देवेंद्र फडणवीस यांना जाणूनबुजून भाजपने अपमानित केलं . हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय -दिग्विजय सिंह

पुणे: संपूर्ण देशाचं लक्ष ज्या सत्तांतराकडे लागलं होतं. ते सत्तांतर अखेर राज्यात घडून आलं.  त्यानंतर अर्ध्याच तासात चक्र अशी काही फिरली की उपमुख्यमंत्रीपदी फडवीसांना शपथ घ्यावी लागली. फडणवीसांची इच्छा जरी नसली तरी थेट केंद्रीय नेतृत्वाकडून आदेश आल्यामुळे फडणवीसांना त्याच दिवशी शपथ घेणं भाग पडलं  तसेच मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना जाणूनबुजून भाजपने अपमानित केलं आहे. हे त्यांच्या चेहऱ्यावरूनही दिसतंय. असा टोला काँग्रेसचे नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत देवेंद्रफडणवीसांना आणि भाजपला लगावला .

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी शहराध्यक्ष रमेश बागवे ,माजी आमदार मोहन जोशी, गोपाळ दादा तिवारी, माझी महापौर कमल व्यवहारे, उपस्थित होते.
एकनाथ शिंदे व भाजप सरकार हे जास्त दिवस चालणार नाही .असे विरोधी पक्ष म्हणत आहेत. त्यावर यांच्याकडे कमी संख्या असताना मुख्यमंत्री केलं. कमी संख्या असलेल्या मुख्यमंत्र्यांची सत्ता जास्त दिवस चालत नाही, असा आमचा अनुभव आहे’.असे दिग्विजय सिंह म्हणाले.

महाराष्ट्रात जे नवीन राजकीय घडामोडी झाली वर दिग्विजय सिंह म्हणाले,जे झालं हे काही नवं नाही. निवडून आलेल्यांकडून लोकशाही विकत घेतली जात आहे. भाजपचा लोकशाही आणि भारतीय संविधानावर विश्वास राहिला नाही. पक्षांतर बंदी कायदा पायदळी तुडवला जात आहे. बहुमत विकत घेतलं जात आहे. असेही दिग्विजय सिंह म्हणाले.
दिग्विजय सिंह म्हणाले, ‘गुरू गोवळकर यांनी भारतीय तिरंग्याला अपवित्र म्हणून विरोध केला होता. मात्र, आता भाजप भारतीय तिरंगच बदलत आहे. तिरंगा हा खादी कापड, कापूस, सुतापासून बनवायला हवा. मात्र, आता तिरंगा हा चीनमधून आणलेल्या पॉलिस्टर कापडापासून बनवला जात आहे’.
‘गोव्यात काँग्रेसचे आमदार भाजपच्या गटात चालले आहेत.त्यांच्यापैकी किती आमदारांवर ईडी केस आहे हे तुम्ही पहा. भाजपकडून लोकशाही विकत घेतली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तर मुख्यमंत्री झाले, मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडली, पण ते उपमुख्यमंत्री देखील झाले नाही’.असे दिग्विजय सिंह पुढे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: