fbpx

ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर ने सोलर डेकॅथलॉन स्पर्धा २०२२ मध्ये २ पुरस्कार पटकवले

पुणे  : सोलर डेकॅथलॉन ह्या आंतरराष्ट्रीय महाविद्यालयीन स्पर्धेचा पहिला पुरस्कार सोहळा नुकताच दिल्ली येथील हॉटेल ताज मध्ये पार पडला. २०२१ – २२ या वर्षाचा नेट-झिरो बिल्डिंग चॅलेंज अवॉर्ड्स च्या प्रमुख पाहुणे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पीएमओ, कर्मचारी, सार्वजानिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

सोलर डेकॅथलॉन इंडियाने ७ आणि ८ मे २०२२ रोजी व्हर्च्युअल इव्हेंटच्या माध्यमातून यंदाच्या विजेत्यांची घोषणा केली होती. प्रत्यक्ष सत्कार समारंभ १ जुलै २०२२ रोजी आयोजित करण्यात आला. सिंगल फॅमिली हाऊसिंग डिव्हिजनमधील ६ अंतिम संघांपैकी एसएमईएफच्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील टीम अर्निमाला डॉ. जितेंद्र सिंग आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एस. चंद्रशेखर यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक देण्यात आले.

सोलर डेकॅथलॉन इंडिया हि स्पर्धा इंडो-यूएस सायन्स अँड टेक्नॉलॉजी फोरमच्या नेतृत्वाखाली इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन सेटलमेंट्स (आयआयएचएस) आणि अलायन्स फॉर एनर्जी एफिशिएंट इकॉनॉमीच्या (एईईई) वतीने आयोजित करण्यात आली होती. बांधकाम क्षेत्राच्या माध्यमातून हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वास्तविक व चालू प्रकल्पांसाठी एकूण शून्य-ऊर्जा-पाणी असणारे, परवडणारे आणि लवचिक डिझाइन सोल्यूशन्स शिकणे आणि डिझाइन करणे हे भारतीय संस्थांमधील पदव्युत्तर आणि पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वर्षभराचे आव्हान असे या स्पर्धेचे स्वरूप आहे.

सोलर डेकॅथलॉन इंडियाच्या या आवृत्तीत, १६५ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली १०९ संस्थांमधील १३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या ९९ विद्यार्थी संघांनी भाग घेतला होता. ऊर्जा कार्यक्षमता, पाण्याची कार्यक्षमता, चिवटपणा, किफायतशीरपणा, नावीन्य; स्केलेबिलिटी आणि मार्केट क्षमता, आरोग्य, आर्किटेक्चरल डिझाइन, अभियांत्रिकी व संचालन आणि सादरीकरण या दहा निकषांवर या स्पर्धेचे मूल्यमापन करण्यात आले.

एसएमईएफच्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियांत्रिकीचे विद्यार्थी, प्रकल्प भागीदार – असीम फाऊंडेशन आणि पुणे महामेट्रो तसेच उद्योग भागीदार व्हीके : ई – एन्व्हायर्मेंटल पुणे यांच्या एकत्रित संघाने स्पर्धेच्या दोन गटांत भाग घेतला होता. बांधकाम कामगारांसाठी टीम नेस्ट आणि सिंगल फॅमिली हाऊसिंग डिव्हिजनसाठी टीम अर्निमा हे दोन संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत होते. सिंगल फॅमिली हाऊसिंग डिव्हिजनमध्ये टीम अर्निमा विजेती ठरली. तिला ४०,००० रुपयांच्या रोख बक्षीसासोबतच आयआयएचएसमार्फत इनक्यूबेट होण्याची संधी देखील मिळाली. या संघांनी ३-मिनिटांच्या चित्रफीतीतून आपल्या कार्याचे सादरीकरणही केले. त्यात त्यांनी आपल्या कथा सांगितल्या आणि स्वतःच्या प्रकल्पांचे मूल्यही समोर ठेवले. टीम अर्निमाने २०२२-२३ चा सर्वोत्कृष्ट फील्मचा पुरस्कार जिंकला.

वास्तविक व चालू बांधकाम प्रकल्प हाती घेतल्याबद्दल आणि नाविन्यपूर्ण उपाय विकसित केल्याबद्दल त्यांनी सहभागी स्पर्धक आणि सोलर डेकॅथलॉन इंडियाच्या विजेत्यांचे अभिनंदन केले. डॉ. सिंग यांनी रिअल इस्टेट डेव्हलपर्स, बिल्डर्स, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याच्या आणि समाजाच्या सर्वांगीण भल्यासाठी आपले अनुभव, कौशल्य आणि संसाधने एकत्र करण्याच्या गरजेवरही भर दिला. त्यांनी सीओपी-२६ च्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या पंचामृत हवामान कृती अजेंडाची आठवण करून दिली ज्यामध्ये २०७० पर्यंत संपूर्ण शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

एसएमईएफच्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्रिन्सिपल डॉ. पूर्वा केसकर यांनी एकूणच बांधकाम उद्योगाला अधिक फायदा होण्याच्या दृष्टीने नावीन्यपूर्णता आणणे, नाविन्यतेची संस्कृती निर्माण करणे आणि डिझाईन स्टुडिओला अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने संपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व केले. याचाच परिणाम म्हणून एसएमईएफस्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विविध डिझाइन आणि कन्स्ट्रक्शन फॅकल्टीच्या टीमचा हा एक सहयोगी प्रयत्न होता. यात आर्कि. दिव्या मल्लवरप्पू आणि आर्कि. विनिता लुल्ला यांना संचालिका- पूजा मिसाळ, प्रिंसिपल डॉ. पूर्वा केसकर आणि शैक्षणिक समन्वयक आर्कि. मनाली देशमुख यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

%d bloggers like this: