Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

खडकवासला धरण 42.34 टक्के भरले

पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हे धरण एकूण क्षमतेच्या 42.34 टक्के भरले आहे.
टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 9.69 दशलक्ष घनमीटर पाणीसाठी असून धरण 9.23 टक्के भरले आहे.
वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 71 दशलक्ष घनमीटर पाणीसाठी असून धरण 19.55 टक्के भरले आहे.
पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 71.40 दशलक्ष घनमीटर पाणीसाठी असून धरण 23.67 टक्के भरले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading