fbpx

‘वारी पुस्तकाची; वारी वाचनाची’ बी.बी.एन.एस स्कूलचा अनोखा वारी सोहळा

पुणे: “वाचाल तर वाचाल”, आजच्या आधुनिक विज्ञान व मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत आहे. त्यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे या हेतूने पुण्यातील बालाजी नगर परिसरातील गुरूकुल एज्युकेशन फाऊंडेशन’ द्वारे संचालित बी.बी.एन.एस. Blooming Buds Nursery School च्या वतीने ‘वारी पुस्तकाची; वारी वाचनाची’ या थीम वर आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवार दिनांक ८ जुलै २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या वारीमध्ये विद्यार्थी विविध वेशभूषा करून सहभागी झाले होते. यामध्ये विठ्ठल, रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, वासुदेव, वारकरी आदींच्या वेशात खाद्यावर पालखी, डोक्यावर ग्रंथ तर गळ्यात टाळ घेऊन हरिनामाचा जयघोषात वारी सोहळा संपन्न झाला. सदर प्रसंगी परिसरातील पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका राणीताई भोसले यांनी पालखीचे स्वागत केले व फुगडी खेळून वारीचा आनंद घेतला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी Blooming Buds Nursery School गेल्या बारा वर्षांपासून सेवा देत आहे. वर्षभरात विविध कार्यक्रम शाळेच्या वतीने आयोजित केले जातात. पालकांनाही वाचनाची सवय असावी यासाठी शाळेत वाचन कट्टा देखील आहे अशी माहिती BBNC च्या संचालिका सौ शारदा विनोद दातीर यांनी दिली. यावेळी गुरूकुल एज्युकेशन फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष विनोद दातीर, शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने वारीत सहभागी झाले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: