राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीची निवडणुका जाहीर
मुंबई : राज्यातील 17 जिल्ह्यांतील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. तसेच, 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीच्या प्रक्रियेला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार आहे. त्यानंतर, 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, क्लाहूपर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे.
निवडणुक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
उमेदवारी अर्ज उपलब्ध : 22 ते 28 जुलै.
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी 22 ते 28 जुलै
अर्जाची छाननी : 29 जुलै
अर्ज मागे घेण्याची मुदत : 4 ऑगस्ट दुपारी 3 पर्यंत
उमदेवारी अर्जावरील आक्षेप : 8 ऑगस्ट
मतदानाचा दिनांक : 18 ऑगस्ट
मतमोजणी आणि निकाल : 19 ऑगस्ट
अ वर्ग नगरपरिषदा – भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड, उस्मानाबाद
ब वर्ग नगरपरिषदा – मनमाड, सिन्नर, येवला, दौंडाईचा- वरवाडे, शिरपूर- वरवाडे, शहादा, अंमळनेर, चाळीसगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, चाकण, दौंड, कराड, फलटण, इस्लामपूर, विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जयसिंगपूर, कन्नड, पैठण, अंबेजोगाई, माजलगाव, परळी-वैजनाथ, अहमदपूर, अंजनगाव- सुर्जी
क वर्ग नगरपरिषदा – कुरुंदवाड, मुरगुड, वडगांव, गंगापूर