fbpx
Monday, September 25, 2023
Latest NewsNATIONALTOP NEWS

अमरनाथ जवळ ढगफुटी, 15 यात्रेकरुंचा मृत्यू

नवी दिल्ली : अमरनाथ जवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या ढगफुटीत 15 यात्रेकरुंचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. रेस्क्यू ऑपरेशनसाठी एनडीआरएफ (NDRF)ची टीम घटनास्थळी पोहचली असून एसडीआरपी (SDRF)च्या मदतीने रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहे. 

ढगफुटीमुळे अमरनाथ गुंफेजवळ यात्रेकरुंसाठी उभारण्यात आलेले तंबू आणि लंगर पाण्यात वाहून गेले आहेत. तर यात्रेकरुंना एअर लिफ्ट करून सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने थैमान सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमरनाथ येथेही पावसाचा जोर वाढल्याने यात्रा थांबवण्यात आली होती. यामुळे सगळे यात्रेकरु तंबू आणि छावण्यांमध्येच थांबले होते. मात्र संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक ढगफुटी झाली आणि मुसळधार पावसाच्या पाण्यात तंबूच वाहून गेले. तर काही ठिकाणी तंबूत पाणी शिरले. यामुळे भयभीत झालेले भाविक सैरावैरा धावू लागले. मात्र तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ एनडीआएफ आणि एसडीआरएफ तसेच ITBP यांना संपर्क साधून पाचारण केले. त्यानंतर यात्रेकरूंना एअर लिफ्ट करुन सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाचा धोका कमी झाल्याने ३० जून पासून पुन्हा यात्रा सुरू करण्यात आली. यामुळे यावर्षी तीन लाख भाविक या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.. ४३ दिवस चालणारी ही यात्रा ११ ऑगस्टला संपणार आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: