fbpx

रिटेल एशिया पुरस्कारांमध्ये ‘द बॉडी शॉप’ सन्मानित

मुंबई : आंतरराष्ट्रीय पर्सनल केअर ब्रॅण्ड द बॉडी शॉप इंडियाला रिटेल एशिया अवॉर्डसमध्ये दोन श्रेणींमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले आहे. १७व्या रिटेल एशिया अवॉर्डस् २०२२ पुरस्कार सोहळ्यामध्ये हेल्थ अँड ब्युटी गटातील रिटेलर ऑफ द इअर आणि ईएसजी इनिशिएटिव्‍ह ऑफ द इअर फॉर प्रोजेक्‍ट एन.ए.आर.आय. पुरस्कार प्रदान करण्यात आला. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या सोहळ्यामध्ये प्रदेशामधील सर्वोत्कृष्ट रिटेलर्स एकत्र येतात आणि या सोहळ्यात रिटेल क्षेत्रातील लक्षणीय/अभिनव उपक्रमांना गौरविण्यात येते.

ब्रिटिश कॉस्मॅटिक ब्रॅण्ड, द बॉडी शॉप १६ वर्षांहून अधिक काळापासून भारतात कार्यरत आहे आणि या ब्रॅण्डसाठी भारत ही एक अतिशय महत्त्वाची बाजारपेठ आहे. अधिक व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी विविध संस्थांशी भागीदारी करत या ब्रिटिश ब्रॅण्डने २००६ साली भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला व मुंबई, महाराष्ट्र येथे आपले पहिले स्टोअर उघडले. आज देशाभरातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांतील ३०,०० हून अधिक पिनकोड पत्त्यांवर कंपनीची २०० हून अधिक स्टोअर्स आहेत. या पुरस्काराने आजवर अनेक मानसन्मान मिळविणा-या या कंपनीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

द बॉडी शॉपच्या प्रोजेक्ट एन.ए.आर.आय. मुळे या ब्रॅण्डला ईएसजी इनिशिएटिव्ह श्रेणीमधील आपला दुसरा पुरस्कार मिळाला. पीएफसी फाउंडेशन, बेंगळुरू, कर्नाटक यांच्या साथीने कचरावेचक महिलांसाठी तळागाळाच्या पातळीवर चालविला जाणारा एन.ए.आर.आय. प्रकल्प पोषण, क्षमता, पुनर्प्रशिक्षण आणि समावेशकता या चार आधारस्तंभांवर आधारित आहे.

द बॉडी शॉप इंडियाचे उपाध्यक्ष विशाल चतुर्वेदी म्हणाले, “प्रतिष्ठेच्या रिटेल एशिया अवॉर्डसमध्ये द बॉडी शॉपला दोन पुरस्कार मिळाले या गोष्टीने आम्ही भारावून गेलो आहोत. भारतात आपल्या व्यापारी कामकाजाची १६ वर्ष पूर्ण करत असताना देशभरातील इतर लक्षणीय समव्यावसायिक कंपन्या आणि ब्रॅण्ड्समधून आमच्या कामाची दखल घेतली जाणे ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. बदल घडवून आणणारा बिझनेस या नात्याने नेहमीच चांगल्या गोष्टींना बळ देणारे माध्यम म्हणून प्रयत्न करत असलेल्या आमच्या ब्रॅण्डचे ब्युटी रिटेलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी तसेच पर्यावरण आणि सामाजिक न्यायाप्रतीच्या बांधिलकीसाठी झालेले कौतुक त्याच्या कामगिरीला साजेसेच आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: