fbpx
Monday, September 25, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद

पुणे : प्रमुख राज्यमार्ग क्र. १५ महाड ते पंढरपुर (नवीन घोषीत राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडी) या महामार्गावरील धोकादायक असलेला भाग कि.मी. ८१/६०० ते कि.मी. ८७/०० वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत अवजड वाहतुकीकरीता संपुर्णपणे बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पिवळा, नारंगी आणि लाल  इशाऱ्याच्या वेळी दुचाकी, तीन चाकी व हलकी वाहने तसेच इतर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीकरीता रस्ता बंद करुन या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाद्वारे म्हणजेच पुणे-पिरंगुट-मुळशी-ताम्हिणी घाट-निजामपूर-माणगाव-महाड या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
000

Leave a Reply

%d bloggers like this: