fbpx
Thursday, September 28, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

गॅस सिलेंडर दरवाढ च्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

पुणे : केंद्रातील मोदी सरकारने अजूनही महागाई कमी केली नाही. गॅस सिलेंडरचे दर सुद्धा वाढवले आहेत. वाढत्या महागाईमुळे गॅस सिलेंडरचे दर कमी करावेत अशी नागरिकांची मागणी आहे. मोदी सरकारने महागाई कमी केली नाही म्हणून विरोधी पक्ष परत एकदा आक्रमक झाले आहेत. पुण्यात गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केले.

हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विद्या चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष मृणाल वाणी यांनी केले. या आंदोलनाला वैशाली नागमोडे, व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. मृणाल वाणी म्हणाल्या, या मोदी सरकारने गॅस सिलेंडर दरवाढ ही कमी केली नाही ही रोज दरवाढ वाढवत आहे. या विरुद्ध कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. नाहीतर सर्वसामान्य जनतेचे भरपूर हाल होतील. आज आम्ही गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात आंदोलन करत आहोत, असे मृणाल वाणी म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: