Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्याचे पालकमंत्री होणार का? यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,तुम्हाला कळलं तर मला सांगा

पुणे : राज्यात शिवसेने विरुद्ध एकनाथ शिंदे यांनी केल्या बंडामुळे राज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार बनले .एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. या सरकारचा अजून मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होणार का असा प्रश्न सगळ्यांना पडत आहे. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यावर चंद्रकांत पाटलांनी माहिती दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले.तुम्हाला कळलं तर मला सांगा, असे उत्तर दिले.
आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील हे पुण्यात एका कार्यक्रमात आले असता त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.
महाविकास आघाडी सरकारवर एकनाथ शिंदे गटातील आमदार व भाजपचे नेते सतत टीका करत आहेत. आज चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बातचीत करताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले,महाराष्ट्रात हिंदुत्व विरोधी, विकास विरोधी, विकास कामे ठप्प करणारे, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे, कुठलीही चूक नसताना जेलमध्ये घालणारे असे एक महाभयानक सरकार बऱ्याच वर्षांपूर्वी कृत्रिम युती करून आले होते. अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.
देवेंद्र आणि एकनाथ या दोघांच्या अथक प्रयत्नामुळे गेले. महाराष्ट्रात गेल्या १५ दिवसात इलेक्ट्रॉनिक मीडियाचा टीआरपी प्रचंड वाढला होता. कार्यकर्ताच नाही तर सर्वसामान्य माणूस या बातमीची जोडला गेला होता, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदे गटातील आमदारांना लोक व मीडियावाले बंडखोर आमदार असे म्हणत आहेत, त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,बंडखोर हा शब्दच चुकीचा आहे. हे सरकार भाजप शिवसेना युतीचे आहे. मुख्यमंत्री पदावरून कुठलीही नाराजी भाजपमध्ये नाही. हिंदुत्वाचं रक्षण करणारे, विकासाला चालना देणारे हे सरकार असल्याने भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता प्रत्येक कार्यकर्ता खुश आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
लोकशाहीमध्ये बहुमत चालतं. आकडे चालतात. हा आकडा ज्यांच्याकडे आहे तो खरा सरकार मधला पक्ष. पण यावर टिप्पणी करण्यासाठी मी काही घटनातज्ञ नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्याला जे दिसतं ते म्हणजे आता शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे आणि भाजप शिवसेना हे सरकार आलेलं आहे.असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केली होती, तेव्हा भाजपकडून आमचा याच्याशी कोणताही संबंध नाही, असं सांगण्यात आलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणालेत, जर कोणी एखादा प्रयत्न करत असेल आणि त्यांना आमची मदत लागली तर आम्ही करायची की नाही मदत? त्यामुळे आमचा तेव्हा आमचा काहीही संबंध नव्हता. आम्ही वारंवार असं मांडत होतो की अंतर्गत विरोधामुळे हे सरकार पडेल. मग एक पोकळी निर्माण होईल आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही विचार करू. असे आम्ही म्हणत होतो.असेही स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिले.
राज्यात भाजपची सत्ता आल्यामुळे.पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रभाग रचना बदलली जाणार आहे. असा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष करत आहेत. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, मी काही असं म्हणणार नाही. कारण आधीच्या सरकारने प्रत्येक नियम पायदळी तुडवून जे केलं, असं काही हे सरकार करणार नाही. नियमात काय बसतं हे मला माहीत नाही. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading