fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

 ‘बायोसीएनजी’ (सी.बी.जी) गॅसवर धावणाऱ्या PMP बसचे उद्घाटन

पुणे : ओल्या कचर्‍यांपासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक ‘बायोसीएनजी ( सी. बी. जी ) वर धावणाऱ्या दोन
पीएमपीएमएलच्या सीएनजीच्या बसेसचे उद्घाटन पुणे महानगरपालिका मुख्य कार्यालय येथे शुक्रवार दि. 1 जुलै रोजी
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पुणे
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) दत्तात्रय झेंडे, वाहतुक व नियोजन अधिकारी
चंद्रकांत वरपे, प्रभारी चिफ मॅकेनिकल इंजिनीअर रमेश चव्हाण, कामगार व जनता संपर्क अधिकारी
सतिश गाटे, भांडार अधिकारी  चंद्रशेखर कदम,  ;इंडियन ऑईल’ चे जनरल मॅनेजर (AESD) के.
आर. रवींद्र, इंडियन ऑईल चे मंडल प्रमुख नितीन वशिष्ठ, इंडियन ऑईल चे पुणे मंडल कार्यालय चे प्रमुख
मयांक अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नुरीएल पेझरकर, नोबल एक्सचेंज च्या संचालिका मा.श्रीमती. श्वेता
नेगी, नोबल एक्सचेंजचे जनरल मॅनेजर (ऑपरेशन) अश्विन झांबरे, नोबल एक्सचेंजचे संस्थापक यांची प्रमुख
उपस्थिती होती.

नोबल एक्सचेंज या कंपनीव्दारे पुणे शहरात गोळा झालेल्या ओल्या कचर्‍यांपासून तयार होणाऱ्या
‘बायोसीएनजी बनवून तो इंडियन ऑईल यांच्या रिटेल पंपावरून पीएमपीएमएलच्या सीएनजी बस मध्ये भरला जाणार
आहे.  केंद्रिय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालय यांच्या Sustainable Towards Affordable Transportation
या योजनेखाली  इंडियन ऑईल  कंपनी भागेदारीत असणार आहे. दररोज १००० किलो ‘बायोसीएनजी  तयार होणार
असुन हा तयार झालेला ‘बायोसीएनजी  न्यु ॲटो कॉर्नर सोमाटणे फाटा येथे पीएमपीएमएलच्या सीएनजी बस मध्ये
भरला जाणार आहे. सदरची बसची चाचणी टाटा मोटर्स, ARAI ( ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन इंडिया) व आर. डी.
ई (व्हेईकल ॲन्ड रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट) यांनी केली आहे. सदर पर्यावरणपूरक बायोसीएनजी वर चालणाऱ्या
बसेस ह्या ‘निगडी ते लोणावळा’ या मार्गावर धावणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading