Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

फक्त नियंत्रणासाठी देवेंद्र फडणवीसांचा बळी का? – अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

पुणे:  चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत.मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले.एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का? देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर असे पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत
प्रकाश आंबेडकर म्हणाले,फडणवीस यांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं आहे का हे केंद्रात विचारायला हवं. सरकार वर नियंत्रण ठेवायचे होते तर चंद्रकांत पाटील पण होते, असं देखील ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 11 जुलै रोजी पीटिशन शिवसेनेकडे गेलं तर आपली नामुष्की होऊ नये म्हणून फडणवीस यांनी शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं असावं. राज्यपालांनी फ्लोर टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या. सभागृहात कामकाज करुन अध्यक्ष निवडण्याच्या अधिकार दिला नाही. हे सरकार व्हीपचं असेल. कुठल्याही पक्षात व्हीप काढणाऱ्याची नेमणूक होते ती पक्षाच्या अध्यक्षांकडे असते. शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच आहे हे मान्य करावं लागेल. वेगळा गट जो झाला आहे ते ही आज शिवसेना आमची आहे असं म्हणत आहेत. व्हीप जो काढण्यात आला होता त्याला डीफाय करण्यात आलं. माझ्या मते ते अॅन्टी डिफेक्शन लॉ मध्ये बसत आहे असं वाटतं. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
११जुलै रोजी विश्वास धारक ठराव होईल असं महाविकास आघाडी मधील मंत्र्यांना वाटत त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले,गटनेत्याला कुठलाही अधिकार नसतो. राज्यपालांना ज्यावेळी वाटतं की या सरकारला बहुमत नाही तेव्हा ते विरोधी पक्षाला विचारू शकतात त्यामुळे हे चुकीचे वाटत नाही.
सध्या सुरु असलेल्या वेगवेगळ्या नेत्यांच्या चौकशांसंदर्भात यावेळी त्यांनी म्हटलं की, मी फकीर माणूस आहे, माझ्याकडे कोणी आयकर विभाग, ईडी येत नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading