बीएचटीसीच्या उत्पादन सुविधा व संशोधन आणि विकास केंद्राचे उद्घाटन

पुणे : बेहर हेला थर्मोकंट्रोल जीएमबीएच (बीएचटीसी) या ऑटोमोटिव्ह डिस्प्ले / एचएमआय सोल्यूशन्स आणि हवामान नियंत्रण तसेच थर्मल व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील जागतिक तंत्रज्ञान आघाडीच्या कंपनीने आपल्या पुण्यातील अद्ययावत पूर्णपणे एकात्मिक उत्पादन सुविधेचे उद्घाटन केल्याची घोषणा केली. या नवीन सुविधेचे उद्घाटन मायकेल जेगर, मुख्य कार्यकारी अधिकारी, बीएचटीसी ग्रुप, सुदीश करिमबिंगल, व्यवस्थापकीय संचालक, बीएचटीसी इंडिया, क्रेस कोलजा, ग्रुप सीईओ आणि बीएचटीसी इंडियाचे मंडळ सदस्य, बर्नाड कुल्होफ, कार्यकारी उपाध्यक्ष विक्री, बीएचटीसी ग्रुप, डॉ. राल्फ ट्रॅप, कार्यकारी उपाध्यक्ष संशोधन आणि विकास बीएचटीसी ग्रुप यांच्या उपस्थितीत झाले.

पुण्यातील सुविधा १२०,००० चौरस फुटांमध्ये पसरलेली आहे आणि यात सुमारे ३०० लोक काम करतात. कंपनीने भारतात १० दशलक्ष युरोंची गुंतवणूक केली आहे आणि त्यांच्याकडे २०२३ पर्यंत आणखी ८ ते १० दशलक्ष युरोंची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. या नवीन सुविधेतून स्थानिक आणि जागतिक ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्या जातील.

त्यांच्या या नवीन सुविधेच्या उद्घाटनामुळे बीएचटीसीच्या जागतिक संशोधन आणि विकास नेटवर्कच्या मुख्य खांबांपैकी एक म्हणून भारताचे स्थानीय महत्त्व स्पष्ट झाले आहे. भारतातील बीएचटीसीचे अभियंते आमच्या स्थानिक आणि जागतिक ग्राहकांसाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवसंशोधनांवर काम करत आहेत. या विस्तारासोबत बीएचटीसीचे ध्येय आगामी महिन्यांमध्ये जागतिक विकास उपक्रमांमध्ये वाढ करण्याचे आणि आमच्या संशोधन आणि विकास शक्तीमध्ये ३०० पर्यंत वाढ करण्याचे आहे. कंपनीने एक डायनॅमिक, समावेशक आणि पारदर्शक कार्य वातावरण आमच्या नवीन कार्यालयात तयार केले असून त्यातून भारतात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम बुद्धिमत्तांना आकर्षित केले जाईल. अद्ययावत हवामान नियंत्रण आणि एचएमआय सोल्यूशन्ससाठी सक्षमतेचे जागतिक केंद्र म्हणून बीएचटीसी त्यांच्या स्थानिक ज्ञानाचा वापर उत्तम, नावीन्यपूर्ण आणि किंमत प्रभावशाली उपाययोजना त्यांच्या जागतिक आणि स्थानिक ग्राहकांना देण्यासाठी करत आहेत.

या निमित्ताने बोलताना कोलजा क्रेस, मुख्य वित्तीय अधिकारी, बीएचटीसी ग्रुप आणि बीएचटीसी इंडियाचे संचालक मंडळ सदस्य म्हणाले की, “बीएचटीसी भारतीय बाजारपेठेप्रति आमच्या दीर्घकालीन वचनबद्दतेबाबत काम करत आहे. अद्ययावत सुविधेद्वारे बीएचटीसीच्या स्थानिक आणि जागतिक ग्राहकांना सुविधा दिल्या जातील.

बीएचटीसी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुदीश करिमबिंगल म्हणाले की, “आम्हाला आमच्या नवीन सुविधेचे पुण्यात उद्घाटन करून आणि भारत सरकारच्या ‘लोकल फॉर ग्लोबल’ उपक्रमाचा भाग होताना खूप आनंद होत आहे. नवीन सुविधेतील गुंतवणूक आमच्या उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करेलच त्यासोबत रोजगार निर्मिती आणि कौशल्यपूर्णता यांच्यावर सकारात्मक प्रभावही टाकेल. आम्ही आमचे २०२५चे धोरणात्मक ध्येय साध्य करण्यासाठी सज्ज आहोत. भारतात ऑटोमोटिव्ह एचएमआय आणि हवामान नियंत्रण उत्पादनात नेतृत्व करण्यासाठी तयार आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: