‘वी’ महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांना देत आहे उत्कृष्ट व्हॉइस कॉलिंग अनुभव

 पुणे : आघाडीचा टेलिकॉम ब्रँड ‘वी’ ने महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांमध्ये VoLTE क्षमता दुपटीने वाढवून तेथील ग्राहकांना मिळणाऱ्या व्हॉइस कॉलिंग अनुभवात अजून जास्त सुधारणा केली आहे. नेटवर्कने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे आता अजून जास्त ‘वी’ ग्राहकांना VoLTE वापरून कॉल्स करता येतील आणि सुपरफास्ट कॉल कनेक्टसह HD क्वालिटी स्पष्ट आणि उत्तम आवाजाचा आनंद घेता येईल. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये सर्व शहरे आणि गावांमध्ये ‘वी’ ग्राहकांना VoLTE कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षभरात ‘वी’ ने ९०० MHz आणि २१०० MHz अतिरिक्त तैनात करून महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये 4G क्षमता वाढवली आहे. या टेलिकॉम सर्कलमध्ये सर्वात कार्यक्षम ९०० MHz बँड स्पेक्ट्रम सर्वात जास्त तैनात करून ‘वी’ ने आपल्या ग्राहकांसाठी अधिक सुस्पष्ट आवाज आणि इमारती, घरांच्या आत अधिक चांगला नेटवर्क अनुभव मिळवून दिला आहे.

वोडाफोन आयडियाचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड रोहित टंडन म्हणाले, “महाराष्ट्र आणि गोव्यातील 4G मोबाईल युजर्सना मी आग्रहाचे आमंत्रण देऊ इच्छितो की त्यांनी ‘वी’ VoLTE नेटवर्कवर यावे आणि वरच्या दर्जाचा कॉलिंग अनुभव मिळवावा. या सर्कलमध्ये आमचा 4G नेटवर्क विस्तार वाढवण्यासाठी आणि शहरी व ग्रामीण ठिकाणी कव्हरेज अधिक जास्त मजबूत करण्यासाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक वेगवेगळे उपक्रम हाती घेतले होते. आता आम्ही या दोन राज्यांमध्ये आमची VoLTE क्षमता दुपटीने वाढवली आहे त्यामुळे आता अजून जास्त वी ग्राहक त्यांच्या कुटुंबियांसोबत, मित्रमंडळींसोबत दीर्घकाळ, अखंडित बोलू शकतील. ‘वी’ VoLTE मार्फत तातडीने कॉल कनेक्ट आणि अल्ट्रा HD व्हॉइस सुस्पष्टता यांचा अनुभव घेण्यासाठी ‘वी’ ग्राहकांना VoLTE सक्षम डिव्हाईस असणे आवश्यक आहे.”

राष्ट्रीय स्तरावर ‘वी’ ने व्हॉइस कॉल्सची उच्च गुणवत्ता प्रदान करण्याची परंपरा कायम राखली असून, नोव्हेंबर २०२० ते मे २०२२ या १९ महिन्यांपैकी १७ मध्ये TRAIच्या “मायकॉल” ऍप डेटानुसार देशात वीच्या आवाज गुणवत्तेला सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे.

महत्त्वाची बाजारपेठ म्हणून महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करत ‘वी’ पुण्यामध्ये 5G चाचण्या करत आहे.  ५.९२ Gbpsचा सर्वाधिक डाउनलोड वेग प्रदर्शित करत ‘वी’ ने त्यांच्या पुणे येथील 5G चाचण्यांमध्ये तंत्रज्ञानात एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: