स्‍कोडा ऑक्‍टावियाने भारतात १०१,१११ कार्सच्‍या विक्रीसह गाठला ऐतिहासिक टप्‍पा

मुंबई : मासिक व तिमाही विक्री रेकॉर्डस् मोडून काढत स्‍कोडा ऑटो इंडियाने आपल्‍या शिरपेच्‍यात आणखी एका विक्रमाची नोंद केली. ऑक्टाविया क्रमांक १०१,१११ ग्राहकाला डिलिव्‍हर करण्‍यात आली. यासोबत स्‍कोडा ऑक्टावियाने पार्टस् अॅण्‍ड कम्‍पोनण्‍ट्स (सीकेडी) मार्गाच्‍या माध्‍यमातून भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार असण्‍याचा विक्रम देखील स्‍थापित केला. तसेच, स्‍कोडा ऑक्टावियाने आता भारतात सध्‍या सतत विक्रीमध्‍ये दीर्घकाळापासून चालणा-या नेमप्‍लेट्समध्‍ये स्‍थान मिळवले आहे.

स्‍कोडा ऑक्टावियाने संपादित केलेल्‍या उपलब्‍धीबाबत बोलताना स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्‍ड संचालक श्री. झॅक होलिस म्‍हणाले,”ऑक्टाविया भारतातील आमच्‍या प्रवेशापासून स्‍कोडा ऑटोशी संलग्‍न आहे. ऑक्टावियाने २००१ मध्‍ये लॉन्‍च झाल्‍यानंतर भारतीय ग्राहकांना डिझाइन, तंत्रज्ञान, आरामदायीपणा, वैविध्‍यता व ड्रायव्हिंग गतीशीलतेचे महत्त्वपूर्ण लक्‍झरी पॅकेज दिले आणि तिचा स्‍वत:चा विभाग निर्माण केला. तेव्‍हापासून ही वेईकल आतापर्यंतची सर्वाधिक विक्री होणारी सीकेडी बनली आहे. नुकतेच या वेईकलने १ लाख विक्रीचा टप्‍पा पार केला. यासाठी चाहते व ग्राहकांच्‍या आमच्‍या परिवाराचे मन:पूर्वक आभार, ज्‍यांनी दोन दशकांपासून ऑक्टावियावर प्रेम व पाठिंब्‍याचा वर्षाव केला आहे आणि यामुळेच ही उपलब्‍धी शक्‍य झाली आहे.”

ऑक्टाविया नावाचा लॅटिन मूळ क्रमांक ८ दर्शवितो. कारण स्कोडाच्या युद्धोत्तर लाइन-अपमधील ही वेईकल ८वी नवीन मॉडेल होती आणि स्वतंत्र ऑलव्हील सस्पेंशन असलेल्या स्कोडाच्या आधुनिक कारमधील ८वी कार होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगीतामध्ये एक अष्टक हा एक परिपूर्ण मध्यांतर, ८ बीट्सची परिपूर्ण चक्रीय लय आहे आणि तो अनुसरण करण्यासाठी सर्वात सोपा ताल आहे, ज्यामध्ये सर्व शैली व स्वरूपातील जवळ-जवळ सर्व प्रकारचे संगीत तयार केले जाते. अगदी आपल्‍या नावाप्रमाणे ऑक्टावियामध्‍ये संतुलन, सातत्य, वैविध्‍यता आणि साधेपणा सामावलेला आहे. १९५९ मध्ये प्रथम ऑक्टाविया नावाचा वापर करण्यात आला, ज्‍यानंतर १९६१ मध्‍ये ऑक्टाविया कॉम्‍बी हे नाव वापरण्‍यात आले. १९९६ मध्‍ये व्‍हीडब्‍ल्‍यू ग्रुपअंतर्गत पुनर्रचना होण्‍यापूर्वी हे मॉडेल १९७१ पर्यंत उत्पादनात होते. याला कंपनीने अनधिकृतपणे ऑक्टाविया (ओजी) आणि ऑक्टाविया  (ए४) असे संबोधले होते.

आपले मत व्‍यक्‍त करत फर्स्‍ट-जनरेशन ऑक्टावियाचे डिझाइनर ड्रिक वॅन ब्रेकेल म्‍हणाले, ”आम्‍ही पहिल्‍यांदा आमच्‍या ग्राहक चाचण्‍या केल्‍या तेव्‍हा मिळालेल्‍या अविश्‍वसनीय निष्‍पत्तींमधून आमचा प्रबळ विश्‍वास झाला की, आम्‍ही खरंच काहीतरी नाविन्‍यता आणत आहोत. आणि ते तसे घडले. परंपरा, दर्जा व स्‍पोर्टिंग महत्त्वाकांक्षा, तसेच अत्‍यंत किफायतशीर दरामध्‍ये उल्‍लेखनीय एैसपैस जागा अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह ऑक्टाविया सादर करण्‍यात आली. यापेक्षाही कालातीत डिझाइन आणि क्रांतीपेक्षा उत्‍क्रांती तत्त्व ऑक्टावियाला सध्‍याच्‍या उंचीवर पोहोचण्‍यामध्‍ये अत्‍यंत सहाय्यक राहिले आहेत.”

१९९६ मध्‍ये आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर लॉन्‍च करण्‍यात आलेल्‍या या फर्स्‍ट-जनरेशन ऑक्टावियाने स्‍कोडा प्रॉडक्‍शन कार्समध्‍ये अनेक तंत्रज्ञान वैशिष्‍ट्यांची भर केली. तंत्रज्ञान जसे फ्रण्‍ट साइड एअरबॅग्‍ज, सर्व व्‍हर्जन्‍समध्‍ये पॉवर स्टिअरिंग आणि टर्बोचार्ज्‍ड इंजिन्‍स अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: